मला आनंद झाला तो हिंदुस्थानी क्रिकेटचा विजय साजरा झाला म्हणून. मुंबई रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही याच दुःखही तेवढंच आहे. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकताना आपण पहिल्या दोन्ही वेळेला रणजी करंडक जिंकला तो विजय आपल्या कर्तुत्वावर जिंकला होता. तसेच यंदाही आपलं कर्तृत्व त्यापेक्षाही जास्त सरस होतं यात शंकाच नाही आणि हेच त्यांनी हिंदुस्तानी क्रिकेट जगताला दाखवून दिले. […]
पुस्तक प्रदर्शनाच्या मॉलमधून फेरफटका मारताना नेमका हाच अनुभव मिळतो. याची जाण मॉलच्या प्रदर्शनीय खरेदीतून ग्राहकाला येऊ लागलेली आहे. त्यातूनच शहर, गांवागावांत, सभासंमेलनात होणाऱ्या कार्यक्रमातून वा अन्यत्र सातत्याने भरणाऱ्या पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची विक्रमी विक्री उच्चांकाचे परीघ उंचावित अधिकाधिक उलाढाली करू लागली आहे. […]
खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. ” […]
यंदाच्या अनंत चतुर्दशीला लिहिलेल्या माझ्या काव्य लेखातील सरत्या ओळी मला पुन्हा पुन्हा आठवू लागल्या मी बाप्पाकडे काहीतरी मागावं असं म्हणून म्हटलं होतं ….. […]
आणि मी नांदगावकरांच्याच घरात (खारला) १९८४ च्या मे महिन्यापासून त्यांची ‘मानसकन्या’ म्हणून राहू लागले. घरातील प्रत्येकजण तसंच त्यांना भेटायला येणारं प्रत्येकजण त्यांना ‘डॅडी’ या नावानं हाक मारत होता. मी तर एका छोट्याशा खेडेवजा गावातून अमळनेरातून आलेली मुलगी. वडिलांना ‘बाबा’ म्हणून हाक मारण्याची सवय, परंतु वडील हयात नसल्यानं तीही मोडलेली. […]
सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. ‘ॲडव्हेंचरर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे. […]
आमच्या गाडीने मलकापूर सोडलं आणि कोकरूडमार्गे पुण्याला जाण्यासाठी गाडी वळली . पावसाची हलकी सर पडून गेली होती . गाडीने गती घेतली .पुढच्या उतारावर खूप छान दृश्य होतं . मोकळ्या रस्त्यावर दोन चिमण्या ,रस्त्यावरच्या अगदी लहानशा खड्यात साठलेल्या पाण्यात चोच बुडवून तहान भागवत होत्या . दृश्य खरंच मनोवेधक होतं. […]
काही वर्षांपूर्वी बंगाली रंगभूमी ही अतिशय प्रगत आणि प्रगल्भ आहे आणि ती भारतात प्रथम क्रमांकावर आहे, असं मानलं जात होतं, परंतु प्रथम क्रमांकाची जागा आता सर्वांगानी बहरलेल्या अशा मराठी रंगभूमीने घेतली आहे, असं मानायला काहीच प्रतिवाद नसावा. […]
मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत. […]