नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

श्रीमान बाळासाहेब खुशालराव – ऐसपैस

बाळासाहेब खुशालराव ऐसपैस हा गृहस्थ गावांत सर्वांना माहीत आहे. हे गृहस्थ माहीत असण्यासारखेच आहेत. गावांत ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, त्यांना छत्रपति शिवाजीमहाराज कोण हेही माहीत नाही असे खुशाल समजावे. या गावातल्या लोकांना एक वेळ गांधी माहीत नसले तरी चालेल. […]

कारगिल पर्व आणि ‘ ते ‘

गेले तीन तास तो बंकरमध्ये उभा होता. दुर्बिणीतून आसमंत न्याहाळत होता. सगळीकडे शांत होतं ,कसलीही हालचाल जाणवत नव्हती , तरीही पापणी लवू न देता तो कर्तव्य बजावत होता. अंग बधीर होत होतं ,पण भारतमातेच्या संरक्षणाची जाणीव त्याला अकल्पित ऊब पुरवीत होती. समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवरच्या कारगिल क्षेत्रात तो उभा होता . त्याचा दुसरा सहकारी विश्रांती […]

स्मरणगाथा : ४ 

समजा , तुम्ही लेखक किंवा लेखिका आहात . तुमचं पहिलंच पुस्तक चांगलं झालंय . तुम्हाला मानधन मिळालंय . आणि प्रकाशक सांगतोय की आणखी काही लेखन करा , आपण तुमची सगळी पुस्तकं प्रकाशित करू . तर तुम्ही काय कराल ? हातातली सगळी कामं दूर ठेवून लेखनकामाठी करायला लागाल की चक्क लेखनसंन्यास घ्याल ? तेच तर सांगतोय ना […]

दिवाळी अंक आणि मराठी माणूस

मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील. […]

स्मरणगाथा : ३ 

मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते . आणि अचानक मेनका च्या संपादकांचा – राजाभाऊ बेहरे – यांचा फोन आला . ” मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही […]

कल्हईवाला – जुनी आठवण

स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो. […]

स्मरणगाथा : २

— सकाळचे साडेसहा वाजले होते . नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली . दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता . त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं . “गोविंद मोकाशी साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे . ” त्यानं सांगितलं . मी त्याला […]

दिवाळी अंक साकारताना… भाग पहिला

मराठी वाचनानंदात मग्न असलेल्याला दिवाळी अंक नाहीत नाही, असं होऊच शकत नाही. ही चटक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९मधे लावली आणि दिवाळी अंकाचे हे लोण इतकं पसरत गेलं आहे की, त्याची व्याप्ती आकाराच्या बाबतीत मोजायची झाली तर ती रामायण-महाभारतालादेखील मागे सारील! […]

गोव्यातील रम्य सकाळ ! (स्मरणगाथा : १)

प्रचंड उत्साहात आणि गर्दीत निघालेली साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी. उत्साह, उत्सुकता, अभिमान आणि साहित्य संमेलनाच्या वेळी असणारे चैतन्य , दिंडीच्या वेळी जाणवत होते. माऊलींची प्रतिमा ठेवलेली पालखी विविध फुलांच्या गजऱ्यांनी , फुलांच्या माळानी सजवलेली . अवघा आसमंत सुगंधाने , अभंगांच्या गजराने आणि कोकणी गीतांनी भारून गेलेला . […]

शापित गंधर्व – पद्माकर शिवलकर

पत्रिका आणि जन्मवेळ ही अचूक जमायला खरं भाग्य लागतं आणि ते भाग्य प्रत्येक आणि ती भाग्य वेळ प्रत्येकाच्या नशिबात येतेच अशी नाही. मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असाच एक शापित गंधर्व जन्माला आला होता. तो ज्या काळात जन्माला त्या काळात क्रिकेट खेळणं हे अतिशय मानाचं होतं तो सन्मान त्याला मिळाला पण त्याला योग्य ते कोंदण मात्र बसलं नाही आणि तो दुर्दैवी खेळाडू होता पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी ….. […]

1 4 5 6 7 8 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..