जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येईपर्यंत. चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…! […]
आज २१ ऑक्टोबर आहे. साठ वर्षांपूर्वी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित आणि निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, पोलिसांनी कडवी झुंज दिली. पण दुर्दैवाने हे सगळे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवान पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वाना स्फूर्ती मिळावी आणि कर्तव्य, राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. […]
ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे… आजच्या चर्चासत्राचा विषय आहे : १.”मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल” आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत- प्रताप आसबे विश्वंभर चौधरी प्रकाश बाळ हेमंत देसाई समर खडस कुमार सप्तर्षी …आणि आजचा विषय आहे २. “अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय […]
शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘. […]
पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे. […]
मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे. […]
तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद […]
आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले. सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही. […]