नवीन लेखन...

वेळ देणे

हल्ली आपण नेहमी तक्रारी ऐकत असतो की –

काय करावे – वेळच मिळत नाही, ” ” इच्छा खूपच असते पण वेळ देता येत नाही “

 ” आलो असतो हो ,काय सांगू, ” वेळ कधी निसटून गेला काही कळतच नाही “,

 “तुम्हाला तर माहिती आहे -आज काल वर्क-स्ट्रेस किती आणि कसा असतो ते , वेळ काढू म्हटले तरी नो -टाईम “..!

 “ऑफिस कामासाठी वेळ द्यावा लागतो ” हे तर मान्यच करायला पाहिजे ,तरी ही आपल्या समोर खूप व्यस्त आणि मोठ्या कार्यात सतत व्यग्र असणाऱ्या

व्यक्तींची उदाहरणे आहेत की -ज्या नियमाने वेळेचे गणित सोडवतात , आपल्या आवडीच्या गोष्टी करतात ,आवडीचे छंद जपतात “,

त्यांना जर हे जमू शकते ? तर आपल्याला त्यांच्या इतके नाही , तरी थोडे फार जमवता येणे का जमणार नाही ?

यस , असे नक्की करता येते , असे करतांना  एक मोठा “स्पीड -ब्रेकर लागतो ..तो “पण ” या शब्दाचा .

हा स्पीड ब्रेकर दूर करता आला तर ,आश्चर्य कराल इतका फरक पडलाय असे जाणवेल..

पण ” या शब्दच विनाकारण बाऊ करणारे अनेकजण आपल्या भवताली असतात ..बघा याची काही उदाहरणे –

 ” मी केले असतो हो हे काम , पण ,आत्ता करू मग करू , वेळ निघून गेली ..आता काय करू ?

 ” मी करणारच होतोहो  -सगळी तयारी केली होती . पण , ऐनवेळी प्रोब्लम ..काय सांगावे , चान्स हुकला आमचा ,

 ” मी अगोदरच सांगितल होत , त्याला देऊ नका हे काम , पण , आमच ऐकताय कोण ? यातली पुढची गम्मत पहा –

त्याने तर काम केले नाही , पण, याने सुद्धा “त्याला दिले “म्हणून स्वतःहून काहीच केले नाही , फायदा मात्र “पण ” चा घेतला .असो.

काम करायचे ,पण, ते वेळेवर “, ही अट सुद्धा अनेकांना त्रासदायक वाटत असते .

” कामाचं काय घेऊन बसलात राव , करू की ,काय घाई आहे ?,

 आपल्याला बुवा घाई जमत नाही ,काम कसं सावकाशीने करायचे ,म्हणजे ते चांगले होते “.

आता तुम्हीच सांगा -अशा पद्धतीने वागणाऱ्या “वेळ काढू माणसाला “, वेळेची किंमत आणि महत्व समजत नाही असे कसे म्हणता येईल , पण..स्वभाव असतो एकेकाचा

मित्र हो – चालू वर्षाचे सरते दिवस आहेत , नव्या वर्षाची चाहूल लागली आहे ..

तेंव्हा ..”वेळेचे गणित सोडवणे , वेळेचा गुंता सोडवणे , आणि मुख्य म्हणजे

“वेळ देण्याचा प्रयत्न सुरु करणे “, हा संकल्प करू या , आणि या संकल्पपूर्तीसाठी मनापासून “वेळ देऊ या “.

यासाठी एक यादी तयार करू – ती यासाठी की – आपल्याला कशासाठी , कुणासाठी वेळ द्यायचा आहे -हे कळून येईल.

१. सर्वात महत्वाचे – स्वत:साठी वेळ काढून तो द्यायचा आहे – असे केल्यावर – वाचन करणे , चितन आणि मनन करणे , संवाद वाढवणे “

   संपर्क वाढवणे ” यातील गोष्टी जमेल तशा ,जमेल तितक्या करणे.

२. नौकरी . ड्युटी केली म्हणजे काम संपले , वेळ संपली – असे करून कसे चालेल ?, घर सांभाळनाऱ्या गृहिणीसाठी ” घर हे खूप मोठे किचकट कामाचे  कार्यालय आहे “,

   त्यामुळे या कामात तिला मदत केली पाहिजे “, आणि असे करणे सर्वांच्या हिताचे आहे ,हे मनाशी कबुल करावे .

३.  आई-बाबा आणि  “पालक या भूमिकेतून मुलांशी असलेल्या आपल्या नात्यावर चिंतन व्हावे लागणार आहे “,

   ही अतिशय नाजूक आणि गंभीर वेळ ” का आली आहे ? या समस्येवर उपाय करण्याची वेळ आहे “, त्यासाठी सुद्धा इतर सगळी कामं सोडून वेळ        “द्यावा लागणार आहे.

तूर्तास ही त्रि-सूत्री ” अवलंबिली तरी खूप काही करण्यासारखे आहे .

“Time “, समय , वेळ , या गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या आहेत . चान्स , संधी , प्रयत्न , उपलब्धी , मेहनत , परिश्रम , निर्णय आणि निर्णय क्षमता “, समयोचितपणा , प्रसंगावधान “, हे सर्व विशेषणे – वेळ ” संबंधित आहेत .

वेळ घालवणे , वेळ दवडणे , वेळ वाया गेला , वेळ निघून घेली , वेळेवर केले असते तर ..ही वेळच आली नसती ..!,

किती उशीर केलात हो  ..वेळेवर आला असतात तर …! नक्कीच काही करता आले असते ..

हाती वेळ होता तेंव्हा झोपा काढल्या .. आता ऐन वेळी काय होणार ? नुसती फजिती …!

मित्र हो – वरील सर्व उद्गार आपल्या परिचयाचे आहेत , कधी कधी आपल्याला उद्देशून सुद्धा कुणी हे असे म्हणाले असेल , यातून एक नक्कीच म्हणता येते की – वेळ नेहमीच उपलब्ध असतो .. तो मिळत नाही तर तो काढावा लागतो .”एखाद्या कामासाठी “वेळ देणे “, महत्वाचे आहे.

तुम्ही सुद्धा माझे हे “वेळ -आख्यान “कसे वाटले ..यावर वेळ काढून प्रतिक्रिया कळवाव्या ही विनंती.

भेटू ..पुढच्या आठवड्यात ..नवा विषय ..नवा लेख ..

स्नेहांकित –

— अरुण वि.देशपांडे
पुणे.
9850177342

(प्रकाशित – दै.सत्य -सह्याद्री -रविव्वार पुरवणी -सत्य-सरिता .दि.१६-१२-२०१८ )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..