नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच […]

बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे. […]

ज्याचा त्याचा “भूतकाळ”

भूतकाळ हे असे फक्त “स्वतःचे “असतात -फक्त स्वतःचे ! आसपासच्यांना कधी ते दुरून दिसतात, कधी हलकेच स्पर्शून जातात , पण एखादा “रुहानी ” आवाज वाला किशोर त्यांना छेदून जातो , एखादा गुलज़ार त्यावरची खपली काढतो. […]

मराठी वाड्मयातील आत्मचरित्रे

समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.

गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. […]

क्युटशी गोष्ट – भाग २

रविवार सकाळ असूनही काळ्यांच्या स्वयंपाक घरात बरीच गडबड चालू होती. डायनींग टेबलावर डिझायनर प्लेट्स, मोतीचुर लाडूंचा बॉक्स, मलई बर्फी आणि कट्यावर पोह्याची तयारी. एकीकडे गॅसवर दूधही गरम होत होत. […]

चलबिचल निवारक (संक्षिप्त रूपांतरीत कथा १२)

त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला. […]

चेहरे (कथा)

या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ? […]

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]

सुंदरी की वाघ? (संक्षिप्त आणि रूपांतरीत कथा ११)

फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे. कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे. त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे. राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो. परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे. […]

1 156 157 158 159 160 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..