नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

‘वारली’चा वाली

भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली… […]

आई ती आईच – भाग एक

सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली. […]

धुणे

एक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर….‌ […]

माझं गाव – निसर्गरम्य कर्जत

प्रत्येक स्त्रीला विचारले कि तुझे आवडते गाव कोणते? तर तिच्या तोंडून अगदी सहजपणे माहेरच्या गावचेच नाव येईल. मीही त्याहून काही वेगळी नाही. “स्वर्ग जरी दिला तरी याची तोड नाही, माहेरच्या गावची सर कशातच नाही”. हेच खरे. मुंबई पुण्याच्या मध्ये असलेले माझे कर्जत. भरभरून निसर्गाची कृपा असलेले माझे कर्जत. जेष्ठ साहित्यिक कै. राम गणेश गडकरी, कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं लाडकं कर्जत. […]

भटकंतीतील भुतनी

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच! […]

सागरमाथा

एका सामान्य ओझी वहाणाऱ्या हमालाच्या नशिबात, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं भाग्य लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचं, खरंच कौतुक वाटतं.. आज या गोष्टीला एकोणसत्तर वर्षे झालेली असली तरी शेर्पा तेनझिंगला विसरणं कदापि शक्य नाही… त्यांचा तो हसरा चेहरा प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलेला आहे.. तो पाचवीत पाहिलेला रंगीत फोटो अजूनही स्मरणात आहे… आजपर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला असला तरी, तेनझिंगची सर त्यांना नाही… […]

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन. […]

मंजिरी असनारे-केळकर

लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. […]

विंडो सीट

आता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो. […]

1 141 142 143 144 145 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..