बाराव्या दिवशी यात्रा ३०४९ मी. उंचीवरील गरोली पाताळ या ठिकाणी येते. हे अंतरसुद्धा १०-११ कि.मी. आहे. तेराव्या दिवशी यात्रेकरू कैलगंगेत स्नान करतात व ‘पातरनचौनिया’ या मुक्कामाकडे प्रस्थान करतात. हे अंतर १२ कि.मी. असून वाट अवघड व चढणीची आहे. पातरनचौनियाची उंची ३६५८ मी. आहे. कोणतीही यात्रा ही संस्कृतीचे, रितीरिवाजाचे दर्शन आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरी चरणी लीन होण्यात […]
“आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल. आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !” मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली. ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !” थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष […]
देशभर मी कार्यक्रम करत होतो. पण परदेशातील कार्यक्रमांबद्दल सिंगापूर व्यतिरिक्त फार काही घडले नव्हते. काही आयोजकांकडून ऑफर्स आल्या पण त्यांच्या कार्यक्रमांचा स्तर मला पटत नव्हता. शिवाय त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा दौरा करायचा होता. इतके दिवस म्युझिक अॅकॅडमी बंद ठेवणेही मला शक्य नव्हते. एकूण काय हवे तसे काही घडत नव्हते. पण प्रयत्न मात्र मी करतच होतो. […]
दोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे […]
विजयच्या बहिणीने तिच्या लहान मुलाला म्हणजे त्याच्या लहान भाच्यासाठी ५००० रुपयाची छोटी सायकल विकत घेतली… आजूबाजूच्या सर्वच लहान मुलांनी सायकल घेतल्यामुळे त्यालाही घ्यावी लागली. हल्लीची लहान मुलेही आत्मकेंद्रित झालेली आहेत. त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याकडे जे जे आहे ते ते हवे असते. पालकांचाही नाईलाज असतो कारण आजच्या मुलांना वाटून खाणं हा प्रकारच माहीत नाही. पुढे जाऊन हे प्रकरण […]
१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेला हा लेख मुंबई फुगत चालली होती. तेथील लोंढे मोठ्या संख्येने वसई-विरारला धडकत होते. स्वस्त घरांच्या आमिषाने भारतभरातील लोकांची वसईकडे रीघ लागली होती. पिण्याचे शुद्ध पाणी ही मानवाची आद्य गरज आहे. शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. भरपूर पाण्याचे खोटे आश्वासन देऊन बिल्डर लोकांना फसवीत होते. […]
२ मे २००५ या दिवशी सकाळी अभिषेक बच्चन यांचा मला फोन आला. ऑल इंडिया अचिव्हर्स कॉन्फरन्स या दिल्ली येथील संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून ते बोलत होते. २००४ चा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्कारासाठी माझी निवड झाली होती. मला अतिशय आनंद झाला. त्यांचे पुढील वाक्य होते. “हा पुरस्कार सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते […]
उज्ज्चल राजकीय भविष्यासाठी एकच नाव दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट सूर्याजीराव रविसांडे, काका सरधोपटांची वाट पहात होते. सूर्याजीरावांचे मूळनाव ताकसांडे. ताकसांड्यांचे रविसांडे कसे झाले ह्याबद्दल, ताकसांडे ते रविसांडे या ताकसांडे घराण्याच्या इतिहास ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ पहावा. (प्रकाशक रोजची पहाट प्रेस) तर सांगायचा मुद्दा आजच्या कथेचा आणि या इतिहासाचा काही […]
ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या […]