नवीन लेखन...

रक्तापलिकडची नाती…

आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]

गाऱ्हाणी

अशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे. […]

ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग ३

अशा अनेकांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, घडामोडी, चढउतार, गमतीदार आठवणी यांचे सचित्र दर्शन घडवून वाचकांच्या ‘बौद्धिक कक्ष्या’ रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वाचता वाचता’ पुस्तकाद्वारे एका भव्य सृष्ष्टीचे वाङ्मयीन दर्शन घडवत असतानाच, गोविंदरावांनी आपली ‘बौद्धिक क्षितिजे किती  अमर्याद असू शकतात याचे विहंगम दर्शन घडविले आहे. गोविंदराव तळवलकर यांचा, श्री ह. रा. महाजनींसोबत ‘लोकसत्ता’ संपादक आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्सचे […]

विससे विष सेल्फी…

मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं फॅड सुरु झालं. पूर्वी आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करावी लागायची. आता कॅमेराचा मोड बदलला की, आपण स्वतःचा फोटो काढू शकतो…. आज तर वर्षांचा अखेरचा दिवस, एकतीस डिसेंबर!! मी सहजच मोबाईलचा कॅमेरा सुरु केला आणि सेल्फी मोडवर स्वतःला पाहू लागलो. पाहतो तो काय.. जानेवारी पासूनचे डिसेंबरपर्यंतचे एकेक प्रसंग माझ्या चेहऱ्यामागील पार्श्र्वभूमीवर […]

झुकतं माप…

पती आणि पत्नी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं आपण म्हणतो…मात्र प्रत्यक्षात सर्वांना दर्शनी बाजू ही पत्नीचीच दिसते. संसाररथाची ही दोन चाकं एकसारखी, एक विचाराने चालली तरच प्रवास सुखाचा होतो. जे खेड्यातच लहानाचे मोठे झाले, संसार केला, वार्धक्य आल्यानंतर काही वर्षांनी आजारी पडून निजधामाला गेले.. त्यांच्या बाबतीतील काही कटू, मात्र सत्य असणाऱ्या काही गोष्टी… पुरुष […]

स्टेट बँक माझी सखी

स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. […]

मी बँकेमुळे घडलो

मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं. […]

टिकवाल तर टिकेल

डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार. […]

…कधी रे येशील तू?

माझा जन्म साताऱ्यातील एका खेडेगावचा. एक वर्षाचा झाल्यावर पुण्यात आलो. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं व्हायचं. या गावी जाण्यामुळे खेड्यातील जीवन जवळून पाहिलं. शहरातून काही दिवसांसाठीच गावी जात असल्याने आमच्या वयाची मुलं आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पहायची आणि मोठी माणसं ‘आली बामणाची पोरं’ म्हणायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ग्रामीण जीवन अनुभवताना काही गोष्टी मनावर कोरल्या […]

हसू आणि आसू

1978 साल, बँकेच्या काऊंटरवर एक नेहमी येणारा खातेदार येऊन उभा राहिला. त्यावेळी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू होती. काउंटरवरील क्लार्क ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकत होता. […]

1 32 33 34 35 36 286
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..