नवीन लेखन...

चमचे

कप बशा स्टॅंडच्या दोन्ही अंगाने चमच्यांच्या रांगा झुलत असतात. यात मोठ्ठ्या चेहऱ्याचे, लांबट उभ्या चेहऱ्याचे, काही वाटोळया तर काही चपट्या तोंडाचे. उंचीही प्रत्येकाची वेगळी. कुणी लंबाडे तर कुणी मध्यम उंचीचे, काही अगदीच बुटुकलेही असतात, पण त्यांची राहण्याची जागा वेगळी असते. […]

आदिवासींना पंचतारांकित करणारा छाया+चित्र+कार

१९८४ मधील प्रसंग आहे. शोमन राज कपूर आपल्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन चेहरे पाहिले, पण अपेक्षित अशी एकही मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटचा उपाय म्हणून ते एका सुप्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेले. त्या फोटोग्राफरने त्यांच्या संग्रहातील एका मुलीचा फोटो दाखविल्या बरोबर राजकपूर आनंदीत होऊन ओरडले, ‘हीच माझ्या चित्रपटाची नायिका! तिचं नाव काहीही असो, हिला मी मंदाकिनीच म्हणणार!’ तिचं खरं नाव होतं, यास्मिन जोसेफ. ती एक अॅन्ग्लो इंडियन मुलगी होती. […]

माझे आवडते पुस्तक मृत्युंजय

लहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो. […]

मी पाहिलेली ऊर्जा

अखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे  काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला. […]

आनंदाचे ठसे

ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची  सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. […]

अधू झाली माय !

सर्वात खालच्या 50 गुंठ्याच्या जाड काळ्या मातीच्या तुकड्यात व गोविंदा बाबाच्या वाट्याने केलेल्या 15 गुंठे पट्टीत असा एकूण सात ट्रक ऊस म्हणजेच 84 टन उस संगमनेर कारखान्याला गेला होता. नानांनी त्यांची पूर्ण ताकद उसाला लावलेली होती . गावातील व आजूबाजूची सर्व शेतकरी मंडळी नानांच्या या पीक उत्पादन पद्धतीचे जिकडे तिकडे नवल करत होती. […]

ऋणानुबंध

1975-1976 मध्ये बँकेत सहजासहजी नोकरी मिळत असे त्या काळातील गोष्ट. नोव्हेंबर 1976 मध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला लागलो. त्यावेळेस माझे वय अवघे 19 वर्षे पूर्ण. पहिलीच नोकरी. आधी कुठे नोकरीचा अनुभव नाही. मी ज्या दिवशी बँकेत नोकरीला रूजू झाले. […]

आपला प्रवास खूप छोटा आहे…

मी बसने प्रवास करीत होतो. माझ्या पुढच्या बाजूला एक तरुणी बसलेली होती, तिच्या शेजारची सीट सोडली तर संपूर्ण बस भरलेली होती. पुढच्या स्टाॅपवर एक लठ्ठ स्त्री सामानाने भरलेल्या दोन पिशव्यांसह पुढील दरवाजातून बसमध्ये चढली व त्या मुलीच्या शेजारी रेटून बसली. मी तिला न राहवून विचारले की, ‘तू तिला काहीच कसे बोलली नाहीस?’ तिने स्मितहास्य करुन उत्तर दिले, ‘अनावश्यक वाद घालण्यात काही अर्थ नाही, आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे. […]

चाणाक्षपणा

साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. […]

चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. […]

1 34 35 36 37 38 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..