नवीन लेखन...

ये रे ये रे पैसा

एका ब्रँचला एक पेन्शनर आजोबांचा एवढा विश्वास की, एकदा मी रजेवर होते, तर FD करायला आणलेली एक लाख वीस हजाराची रक्कम परत घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, ‘काका पैसे नेण्याआणण्याची इतकी जोखीम का घेतली.’ तर म्हणाले, ‘तू नव्हतीस ना, मग मी आपला परत गेलो.’ […]

चलो, बुलावा आया है…

माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता. […]

आणि मी ज्येष्ठ झाले

म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’ […]

मदतीचा हातभार

तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत ही करतच असतो. अहो, खरंच ! म्हणजे “वॉशिंग मशिन लावणे” तर तुम्ही वाचलच असेल. म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचंय. याशिवाय भाज्या , कांदे, बटाटे, टोमॅटो चिरून…आता चिरून म्हणजे अगदी विळीवर बसून वगैरे नाही हो, सुरीनेच देतो चिरून. भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत […]

आम्हा नित्य दिवाळी

अशिक्षित ग्राहकाला ‘सिस्टम बंध है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है, बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात.  […]

नेत्र लागता पैलतीरी

नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा. […]

बाजारहाट, मन भरून येणारी सैर

मन भरून येणारी सैर ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात, “फ्लॉवर कोबी नीट बघून […]

एक आठवण

2003 च्या 19 नोव्हेंबरला माझी पदोन्नती होऊन मी महाराष्ट्र बँक श्रीवर्धन शाखेत लिपीक म्हणून जॉईन झालो. खरं तर श्रीवर्धन हे एक रम्य ठिकाण आहे. निळ्याशार समुद्रकिनारा व दांडा ते जिवना बंदरपर्यत पसरलेला वाळूचा किनारा! बाजूला नारळी, पोफळीच्या बागा व केवड्याचे बन. डिसेंबर महिना संपत आला व थंडीची गार हवा शांत झोप लागते. मी बँकेच्या समोरच्या यादव […]

इथून ‘दृष्ट’ काढिते, निमिष एक थांब तू…

कोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते. […]

पान…

‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र. […]

1 35 36 37 38 39 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..