नवीन लेखन...

नाना !

खरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो. […]

‘थप्पड’ – शेवाळलेल्या नात्यांसाठी आवश्यक ‘तुरटी’ !

हा चित्रपट आला , चांगलं परीक्षण वाचलं आणि तो गेलासुद्धा ! नुकताच तो घरबसल्या बघायला मिळाला. लॉक डाउन बाबा की जय ! सगळीच नाती सुरुवातीला जुळताना /जुळविताना हवीहवीशी, नवलाईची असतात. कालांतराने अतिपरिचयात त्यांच्यावर शेवाळं साचतं. दोन्ही बाजू एकमेकांना गृहीत तरी धरायला लागतात किंवा ते टिकविण्याचा एकतर्फी प्रयत्न तरी पाहायला मिळतो. […]

आभाळाएवढा !

त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]

रोजनिशी

“दिसामाजी काहीतरी ते लिहावे प्रसंगी वाचित जावे” ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीचा आज अर्थ वर्गात सांगितला गेला काय आणि अचानक माझ्यातला लेखक आणि वाचक लगेच जागृत झाला. मराठीचा शेवटचा तास दररोज मला घरची वाट दाखवत असतो कधी एकदा त्या बर्वे सरांच दाराबाहेर पाऊल पडतंय आणि आम्ही सुटतोय अस होत. […]

पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय

2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’! […]

शंकर मुडके!

सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच. […]

काही माणसं ” अशीच ” असतात !

” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी. […]

समूहाचा पराभव !

मतकरींची एकटाकी लेखणी अधिक प्रभावी , चित्रदर्शी वाटली. माध्यमांतरात अशा तुलना अपरिहार्य , पण  चित्रपट कादंबरीच्या आसपास पोहोचू शकला नाही.  सगळं इंटेन्स नाट्य डायल्युट झालं आणि त्यामुळे निराशा झाली. चित्रपट ही सामूहिक घटना असली तरी मतकरींच्या एका लेखणीपुढे प्रभाव निर्माण करण्यात समूह पराभूत झाला. […]

ऑटो भास्कर!

हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]

जीए……

जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही. […]

1 216 217 218 219 220 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..