नवीन लेखन...

भगवद्गीतेला अभिप्रेत चार जीवनकलह !

या जगतात चार प्रकारचे कलह संभवतात. प्रथम कलह आपण आणि इतरेजन यांच्यात असू शकतो. दुसरा स्वतःशीच (आपुलाची वाद आपणाशी !) तिसरा आपण आणि बाह्य विश्व तर चौथा असू शकतो- आपण आणि ईश्वरात ! पहिले दोन प्रकार आपल्या दैनंदिन जीवनात दिसतात. मात्र उरलेले दोन्ही सहजासहजी दृश्य नसतात. त्यांना आपण सामाजिक कलह / व्यक्तिगत कलह /नैसर्गिक कलह अथवा आध्यत्मिक कलह असेही म्हणू शकतो. त्यातही सामाजिक आणि व्यक्तिगत कलह सामान्यतः नैसर्गिक आणि आध्यत्मिक कलहांचे परिणाम असतात. एक नक्की की या कलहांचे अस्तित्व असेपर्यंत कोणीही एकमेकांवर प्रेम करू शकणार नाही. […]

जाने कहाँ गये वो दिन

आयुष्यभर ज्या चार्ली चॅप्लिनला आदर्श मानलं, त्याने जोकरपण आधीच सिद्ध केलं होतं , पण आयुष्याच्या सायंपर्वात राज कपूरला स्वतःमध्ये जोकर आहे हे मान्य करावे लागले. हा थोडासा मावळतीचा अध्याय होता, जिथे हिशेब सुरु होतात, आठवणी सतावतात आणि मनाजोगती एखादीतरी कलाकृती निर्माण करावीशी वाटते. राजने या टप्प्यावर “मेरा नाम जोकर ” नावाचे धाडस केले -आतल्या आवाजाला स्मरून ! […]

संधी प्रकाशातील “पूर्वा कल्याण”

पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली. आता बोलायचे कोणाशी? […]

तोचि पिता साक्षात मानावा…

माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून ! […]

हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?

हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय ! […]

।। दिठी ।।

पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला. आणि विठुराया पाहात राहिला. […]

लोणी – मनातले

…. विचारांचे लोणी ही जमु लागले होते. असेच विचारांचे मंथन करुन छान चांगल्या विचारांचे लोणी काढुन वाटता आले तर….. अरे वा छानच कल्पना आहे ना… असाच समाज ढवळुन चांगले लोक लोण्या सारखे गोळा करता येतील… मस्तच ना. समुद्र मंथनातून च अमृत बाहेर आले होते ना. […]

न्हाऊ घाल, माझ्या मना

न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ? […]

मातृभाषा

ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच जर आपण विसरून गेलो की आपला परिवार,समाज, विद्या व देशाशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे या सारखा दुसरा मोठा कोणताही शाप या देशात नाही. […]

दिवाळी आली, दिवाळी संपली…

पूर्वी भेटकार्ड पाठवून शुभेच्छा पोस्टाने पाठविलेल्या जायच्या. त्याचं उत्तर आलं की समाधान वाटायचं. त्यासाठी पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचो. आता पोस्टमन गायब झालाय. शुभेच्छा कार्डला स्मार्ट फोनच्या व्हाॅटसअपचा पर्याय आलाय. […]

1 218 219 220 221 222 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..