ऑटो भास्कर!
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]
जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही. […]
रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे. […]
आख्खा ” पिंजर” फाळणीमुळे रक्तरंजित ! फक्त असंवेदनाशील व्यक्तीच डोळ्यांत पाणी न आणता आणि हाताच्या मुठी आवळल्याविना एका बैठकीत पिंजर बघू शकेल. १९४७ ची जखम माझ्या पिढीने पाहिली नाही पण अमृता आणि गुलज़ार ती आम्हाला विसरू देत नाही. या रचनेत अमृता साक्षात वारीस शाहला ( हीर रांझा या सुप्रसिद्ध प्रेम त्रिकोणाचा अक्षर निर्माता ) आवाहन करते आहे […]
आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]
सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत . […]
मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते. […]
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो. […]
“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. “हसणाऱ्या जखमा” नामक काव्यात्म नांव घेऊन आलेला चित्रपट बघायलाच पाहिजे या श्रेणीतला त्या काळात वाटला नाही. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions