देवभूमीतील पंचबद्री – परिचय
हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात. गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून […]
