गंगेच्या उगमपाशी – गोमुख – भाग ३
मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले. त्यावर सोन्याचा कळस चढवला. गंगामातेला सुवर्णछत्र अर्पण केले. पांढऱ्या ग्रेनाईटने बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा व सभामंडप अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात गंगा, यमुना व सरस्वतीच्या मूर्ती असून […]
