नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

अंतराळवीरांचे पोशाख

अंतराळवीरांच्या गरजा या आवश्यकतेनुसार बदलत असतात. अंतराळयानात वावरतानाच्या गरजा वेगळ्या, तर अंतराळयानाच्या बाहेर पडल्यानंतरच्या गरजा वेगळ्या. या गरजांनुसारच त्यांच्या पोशाखात बदल होत असतो. अंतराळवीर वापरत असलेल्या या पोशाखांची ही ओळख… […]

प्राचीन वृक्ष

वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख… […]

सत्याचा शोध

गुन्हेगाराकडून सत्य वदवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारलेल्या आहेत. काही पद्धती रसायनांचा वापर करतात, तर काही पद्धती इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेत, तसेच प्रत्येक पद्धतीला स्वतःच्या मर्यादा आहेत. सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विविध प्रचलित पद्धतींची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख… […]

कमिशनर मॅडम

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला. “साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला […]

त्रिमितीय जीवाश्म

पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं. […]

मनातलं मनापासून – “३८ कृष्ण व्हिला”

काही काही नाटकं ही नाटकाचं नाव बघून, निर्मिती संस्था ,दिग्दर्शक कलाकार बघून लगेच बघावी अशी वाटतात….. असच एक नाटक म्हणजे “३८ कृष्ण व्हिला”. नाटकाचं नाव बघूनच वाटत की, हे एक मर्डर मिस्टरी ,किंवा गूढ अनामिक रहस्यमय असं असावं,पण आपल्याला पहिला धक्का तिथेच बसतो….हे नाटकात रहस्य आहे, धक्का आहे, काय घडत असेल या व्हीला मधे याची सतत उत्कंठा निर्माण करणार आहे.. […]

इमारतींचे पाडकाम

एखाद्या प्रचंड आकाराच्या इमारतीची वा तत्सम बांधकामाची निर्मिती जशी आव्हानात्मक असते, तसेच त्या बांधकामाचे पाडकामही आव्हानात्मक असते. मोठे बांधकाम सुरक्षितपणे पाडताना, अनेक अडचणींवर मात तर करावी लागतेच; पण त्याचबरोबर पाडकाम करणाऱ्या तज्ज्ञांचे स्थापत्यशास्त्रातील ज्ञान, अनुभव, कौशल्य हे सर्वच पणास लागतात. अशी मोठी पाडकामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ही ओळख… […]

नारदमुनींची महाराष्ट्रभेट

नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे. […]

टेडी डे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला. […]

हांतू इस्त्री बारू

आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. […]

1 3 4 5 6 7 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..