हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे. […]
वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का? शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का? आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे. […]
दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली. […]
महापूर, भूकंप, ज्वालामुखी या अगोदर ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून ओळखले जायचे. पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्याच आता ‘मानव निर्मित आपत्ती’ म्हणून ओळखले जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर. […]
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!! […]
रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. […]
जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही. […]
१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंनी पहिले मोटारचलित विमानोड्डाण केले. “विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला सुरु झाला होता. […]
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. […]
सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे. […]