अजब न्याय नियतीचा

नमस्कार वाचकहो,

आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….

या घटनेला चार वर्षे झाली आहेत. काय रहस्य आहे राजच्या गायब होण्यामागे? तो खरंच निघून गेलाय? की राजचा खून झालाय? की कोणी त्याचे अपहरण केलंय? राजने आत्महत्या केलीय की आणखी काही? ….

राजचं नेमकं काय झालंय हे शोधण्यासाठी तुम्हीही येताय ना माझ्याबरोबर?…. चला तर मग..…..

‘अजब न्याय नियतीचा’ या माझ्या क्रमशः प्रसिध्द होणाऱ्या रहस्यमयी प्रेमकथेसोबत ……

— संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 28 Articles
मी संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मा विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये /ऑफिसमध्ये 30 वर्षे (वय वर्षे 18 ते 48 पर्यंत) वेगवेगळ्या पदांवर काम करून गेल्या वर्षी नोकरी या बंधनातुन स्वेच्छा निवृत्ती घेतली. आता फक्त माझ्या आवडीच्या छंदांसाठी वेळ द्यायला सुरूवात केली. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. हौशी नाटकांत अभिनय, पथनाट्य, गायन, यु ट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय, भटकंती करणे, छोट्या कथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीणे चालू आहे. आता दीर्घकथा लिहायला घेतली आहे. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये सोशल मिडीयाचा आणि वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…