नवीन लेखन...

उंच इमारतींतील आग प्रतिबंधन

हिरानंदानी समूहाचा पवई येथील प्रकल्प 

वाढते शहरीकरण आणि विकास सध्या उंचच उंच इमारतींच्या माध्यमातून पहायला मिळतो. आकाशाला गवसणी घालणार्‍या या इमारती निवासी स्वरूपाच्या जशा आहेत तशा त्या व्यापारी हेतूंसाठीही आहेत. ज्या भागात जमिनीची उपलब्धता कमी आहे तेथे पुणे-मुंबई-ठाण्यासारख्या शहरात हे प्रमाण अधिक आढळते.

या वाढत्या विकासाबरोबरच काही आव्हानेही बरोबरीने येत आहेत आणि ती म्हणजे सुरक्षितता. ही जबाबदारी सरकारची, आवश्यक ती धोरणे निश्चित करण्याची, त्यांची अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारण्याची जशी आहे तशीच सुरक्षिततेसाठी आवश्यक ती साधन-सामग्री उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांचीही आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

उंच इमारतीमध्ये आगीचा धोका निर्माण झाला तर ते आव्हान पेलण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाबरोबरच यंत्रणा उपलब्ध असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. उंच इमारतींची रचना करतानाच संभाव्य संकटाचा विचार करून आणीबाणीच्या काळात मदत करणे आणि आपदग्रस्तांची मुक्तता सुकर होईल अशी व्यवस्था आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियमावलीत सुधारणाही हव्यात. आगीची घटना घडली तर प्रत्यक्ष उपाययोजना बरोबरच इमारतीच्या रचनेतील वेगळेपण उपयुक्त ठरू शकते.

इमारतीचे बांधकाम किंवा तिचे आरेखन होत असतानाच संकटकालीन मार्ग, धुराने कोंडले जाऊ नये अशा जागा आणि अनावश्यक गर्दी होणार नाही अशा विविध मजल्यावरील जागा निश्चित होणे आवश्यक असते.

आग वाढणार नाही, ती आहे त्या मजल्यावरच नियंत्रित होईल याची खातरजमा आवश्यक बनली आहे. आगीचा इशारा देणारी यंत्रणा, पाण्याची व्यवस्था, उपलब्ध दाबाने पाण्याची उपलब्धता, आगीच्या बंबासाठी मार्ग या सार्‍या बाबी इमारत किती उंच आहे यावर निश्चित होतात.

ज्यावेळी बांधकाम व्यावसायिक तेथे राहणार्‍यांना वा व्यापार्‍यांना इमारतीचा ताबा देतो तेव्हा आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत आहेत का याची चाचणी करून इमारतीचा ताबा देणे आवश्यक आहे.

आगीच्यासारख्या प्रसंगात नगरपालिकेची आग प्रतिबंधक मदत पोहाचण्यापर्यंतचा काळ खूप महत्त्वाचा असतो आणि त्यात या सार्‍या यंत्रणेचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. अलिकडेच ठाण्यात अशाच स्थितीला सामोरे जावे लागले. बंद असलेल्या सदनिकेतली आग स्थानिक पातळीवरच विझविण्यात आली. कोणतेही मोठे संकट टाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

मुंबई, पवई, ठाणे, पनवेल या भागांत हिरानंदानी समुहाकडून अनेक उंच इमारतींची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यात प्रत्येक प्रकल्पासाठी आगीची सूचना देणारी यंत्रणा, धुराचा शोध आणि वेध घेणारी यंत्रणा, आगीची पूर्वसूचना देणार्‍या यंत्रणेचे नियंत्रण करणारी यंत्रणा, अधिक सुरक्षित आणि सुसज्ज पाणी उपलब्ध करून देणार्‍या पाईप्सची यंत्रणा, आग विझविण्यासाठीचे पर्यायी पंप, पाण्याचा दाब वाढविणारी यंत्रणा आणि तळमजला किंवा त्याखालील भागातही आग प्रतिबंधक यंत्रणा सज्ज ठेवल्या जातात. एवढेच नव्हे तर या संदर्भात आवश्यक ते प्रात्यक्षिकही दिले जाते.

इमारतींचा ताबा घेतल्यावरही अशी प्रात्यक्षिके संभाव्य संकटाचा सामना करण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात. या व्यतिरिेक्त प्रत्येक घटकाने विशेष काळजी घेणे कधीही महत्त्वाचे!

— हिरानंदानी समूह

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..