नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो. आज पर्यंत मी सुमारे ५४ पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यामुळे मीच अधिक आत्ममुख आणि समृद्धच झालो. अनेक ठिकाणी प्रकाशन समारंभास, व्याख्यानानिमित्त देखील जाण्याचा योग आला. त्यामुळे अनेक अभ्यासू नवोदित कवी, लेखकांची आणि माझी सलगी झाली. मैत्री झाली. सर्वांची नावे लिहिणे गरजेचे आहे पण ते अशक्य आहे. या बद्दल दिलगीरही आहे.

एक दिवस मला कल्याणहून कवयित्री स्वदीप्ती नातू यांचा फोन आला होता. (त्यांचा माझा प्रथम परिचय मुंबईत कवयित्री परिता बांदेकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माझ्या हस्ते भांडुपला झाले त्या कार्यक्रमात झाला होता.) कल्याण मधील साहित्य विचारमंच व काव्यकिरण मंडळ या संस्थेचे अध्वर्यू प्रसिद्ध लेखक, कवी, प्रवचनकार, पत्रकार कै. किरण जोगळेकर यांच्या संस्थेतर्फे एक पुस्तक / दिवाळी अंक स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माझ्या हस्ते करण्याचा करण्याचा त्यांचा मानस होता. तेंव्हा त्यांनी “आप्पा तुम्ही शकाल कां? असे विचारले. मी त्यांना मी नकार देणे शक्य नव्हते. संमती दिली, तो कार्यक्रमही कल्याणला झाला. त्यामुळे त्या कार्यक्रमात अनेक कवी, कलाकार, साहित्यिकांचा माझा परिचय झाला त्यात ज्येष्ठ गझलकार आनंद पेंढारकर, कवीवर्य विलास अधिकारी, कवी, लेखक अतुल सोळस्कर, कवयित्री ज्योतिताई शेटे, आजचे महाकवी कालिदास प्रतिष्ठाचे ठाणे जिल्हा व मुंबई प्रदेशचे विभाग प्रमुख कविवर्य जयंतराव भावे तसेच पनवेलचे ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, अशी अनेक साहित्यिक मंडळी भेटली. हाही एक दुग्धशर्करा योगच होता. अशा कार्यक्रमातूनच माझा सर्वत्र परिचय होत राहिला. त्यामुळे सर्वांशी संपर्क वाढला. अनेक मंडळी पुण्यात आली की माझ्या ऑफिसमध्ये मला आवर्जुन भेटावयास येत असत. अशा प्रसंगी मी मुद्दाम स्थानिक असलेल्या साहित्यिकांना देखील बोलावत असे. आमच्या गप्पाछप्पा झाल्या की भले सकाळ असो की संध्याकाळ आम्ही सर्वच पुण्यातील प्रसिद्ध व माझे अगदी १९६५ पासून आवडते न्यू पूना बोर्डिंग या शाकाहारी भोजनालयात जावून जेवत असू.

ठाण्याचे विद्यमान प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले कविवर्य जयंतराव भावे यांचाही संपर्क सातत्याने फोनवर होवू लागला. ते पुण्यालाही आले. आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये काव्यसंमेलनात सहभागी झाले. जयंतराव म्हणजे एक अत्यन्त उत्साही, हसरे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्यामुळेच मुंबई व ठाणे विभागात महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या शाखा सुरू झाल्या त्याचे श्रेय जयंत भावे सरांचेच आहे आणि संस्थचे विभाग प्रमुख म्हणून जयंत भावे सर तर डॉ. योगेश जोशी यांनी उपविभाग प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली. ठाणे, मुंबई भागातही संस्थेचे साहित्यिक कार्य सुरू असून तिथल्या साहित्यिकांचा म्हणजे कवयित्री आरती कुलकर्णी, डॉ. अंजुषा पाटील, डॉ. योगेश जोशी, डॉ. राज परब, डॉ. सौ. परब, ऍड. रुपेश पवार, अशा अनेक साहित्यिक परिवारातील मित्रांचा आज परिचय झाला आहे. माझ्या मानसकन्या कवयित्री सौ.जयमाला वाघ, कवयित्री सौ. गीता केदारे, डॉ. कविता विघे याही पूर्वीपासूनच आमच्या संस्थेच्या सभासद असल्यामुळे आज ठाण्यातही कार्यरत आहेत. पुढे कवी, लेखक अतुल सोळस्कर यांच्याही पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि असे कार्यक्रम, माझी व्याख्याने सर्वत्र होत राहिली.

एक दिवस माझे सातारचे उद्योजक माझे परमस्नेही व सातारचे शेजारी असलेले श्री. प्रकाश भळगट यांचा मला फोन आला की, “आप्पा माझे नगरचे मित्र इंजिनिअर श्री देवेंद्र वधवा यांनी जादूची कांडी हे पुस्तक लिहिले आहे आणि त्याचे प्रकाशन नगरलाच करायचे आहे तर त्यांना तुमचा सल्ला हवे आहे आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहेच आणि माझ्याबरोबर तुम्हालाही यायचे आहे.” लेखक श्री देवेंद्रजी वधवा यांचा संपर्क झाल्यावर मी त्यांना तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन तुम्ही ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी सरांच्या हस्ते करा असा सल्ला दिला. पुढे त्या जादूची कांडी या पुस्तकाचे प्रकाशन नगर येथे डॉ. न.म. जोशी सरांच्या हस्ते झाले देखील. त्या कार्यक्रमाला नगर मधील सर्वच क्षेत्रातील नामवन्त लोक उपस्थित होते. त्यात काही नगरमधील साहित्यिक मंडळी देखील होती.

या प्रसंगातून देवेंद्रजी वधवा आणि माझी छान मैत्री झाली. एक अमराठी भाषिक व्यक्ती उत्तम मराठी भाषेत पुस्तक लिहू शकतो ही गोष्ट निश्चितच दखलपात्र आहे, कौतुकास्पद आहे. त्यामुळे प्रतीवर्ष जो महाकवी कालिदास संस्थेचा लक्षवेधी पुरस्कार आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान तर्फे दिला जातो तो सर्वांच्या संमतीने श्री. देवेंद्रजी वधवा यांना गुरुवर्य डॉ.दभी व गुरुवर्य डॉ. न.म.जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. याचा परिणाम म्हणजे देवेंद्रजी वधवा यांनी पुन्हा दुसरे पुस्तक परिवर्तन लिहिले आणि त्याचेही प्रकाशन नगर येथे माझ्या हस्ते झाले. त्यामुळे माझा व देवेंद्रजींचे मैत्र दुणावले होते. (ते आज महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे आजीव सभासद आहेत.) माझ्या साहित्यिक गोतावळ्यात श्री. देवेंद्र वधवा यांची आणखीन एक लक्षणीय वाढ झाली. नगरच्या मित्र मंडळीमुळे तिथे कार्यक्रम होत राहिले.

अशा प्रकारे मी साहित्य क्षेत्रात रमलो होतो. व्यवसायातून माझ्या मुलांनी मला निवृत्त केले होते. त्यामुळे मला आता भरपूर वेळही मिळत राहिला. मी माझे छंद जोपासत राहिलो, संतचित्रे काढणे, लेखन करणे, वाचन करणे अनेक संस्थानच्या कार्यक्रमात सतत सहभागी होणे. संपर्कात रहाणे सुरू राहिले. त्यामुळे माझा परिचय, स्नेहसंबंध वाढले,सहवास दृढावले.

पुढील 31 व्या भागात पुणेकर साहित्यिकांनी अनुभवलेला देवेंद्रजी वधवा यांचा अगत्यशील आदरातिथ्य आणी विनम्र स्वभाव मी मुद्दाम लिहिणार आहे.

वि.ग सातपुते.

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..