नवीन लेखन...

शिंपी‌ देविदास सौदागर

वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही. […]

‘मे’चे मनसबदार (‘मे’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

‘मे’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या महत्त्वाकांक्षी, उत्कट व उत्साही असल्याचे मानले जाते.  ‘मे’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

आयुर्वेद जडी बुटी भाग ६- अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते. […]

वणीची सप्तशृंगी

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. […]

जे. कृष्णमुर्ती

जे. कृष्णमूर्ती यांनी कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचले नव्हते भगवद्गीता, वेद उपनिषदे, बायबल, कुराण या धार्मिक ग्रंथात कोणता उपदेश सांगितला आहे हे त्यांना माहित नव्हते आणि त्यात त्यांना रसही नव्हता. परंतु भारतीय वेदांतशास्त्रातील अद्वैत दर्शनात प्रकट झालेले चिंतन आणि कृष्णमूर्तींचे चिंतन यात विलक्षण साम्य आढळते असा तत्वाज्ञानाच्या अभ्यासकांचा अभिप्राय आहे. […]

कार्ल्याची एकवीरा

मंदिराचे दाराशी एका कमानीला नऊ लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एका घंटेवर १८५७ असा आकडा कोरला आहे. अर्थात तो इंग्रजीत असून घंटेचा आवाज लोकांना आकर्षित करतो. देवीच्या सभामंडपावर एक शिलालेख दिसून येतो तो असा की एकवीरा देवीचे जुने मंदिर मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या मदतीने इ. सन १८६६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. […]

दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा

कुणाला नांव ठेवण्यावरून, कुणाला व्यंगावरून, कोणाला बोलण्यावरून, कोणाला लिहण्यावरून. पायवाट निर्माण करण्यासाठी फक्त जिद्द लागते. तन-मन-धन अर्पण करून प्रयत्न केले की यशाची पायवाट निर्माण होते. यशाकडे जाताना असंख्य अडथळे, खाचखळगे, धोके, फसवणूक होणारच पण आपल्या ध्येयाकडे जाण्याची जिद्द असेल काय होऊ शकते याचं प्राची हे उदाहरण आहे. […]

आनंदाची अनुभूती

सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. […]

तुळजापूरची भवानी

भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. […]

दुःखाची राणी: मीनाकुमारी

प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते. मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती. […]

1 21 22 23 24 25 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..