नवीन लेखन...

हेलिकॉफ्टर सरळ वर कसे जाते?

हेलिकॉप्टर एकदम वर उडते. याला कारण डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. त्याच्या पात्यांची स्थिती बदलून हेलिकॉप्टर वर जायला रेटा मिळतो. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी वाहन-क्षमता मात्र कमी होते. […]

गरज ई-साक्षरतेची

भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले. […]

ग्यानबाची मेख

ग्यानबाची मेख….!!! कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं, कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं, कपडे काढायची अन फाडायची जणु, चषकी स्पर्धाचं लागली आहे…..!!! शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत, शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म, कॅमेर्‍यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय, हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय…!!! आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं… कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय, पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय, न्यायी धर्मराजा […]

भारताच्या हवाई इतिहासातील महत्वाचे टप्पे

भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा. […]

महापूर – कथा – १

म्हातारी कमरेत पार वाकली होती . काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती . चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते . त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती . म्हातारा नवरा , […]

स्वराज्य @ 350

‘स्वराज्य 350’ या शीर्षकाने सजलेल्या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ आपण येत्या 23 जुलै 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 वाजता, सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, नौपाडा, ठाणे (प.) येथे करीत आहोत. व्याख्यानाचा विषय आहे ‘नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा’ आणि व्याख्याते आहेत ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक. […]

व्रत मौनाचे

आता सरु लागले आयुष्य हे सारे तरीही तुझे मौन मात्र संपले नाही… कसला हा असा दैवयोग भाळीचा हे गूढ तुझे अजूनही कळले नाही… शब्द तुझे अजूनही कां? अव्यक्त हेच मजला अजूनही उमगले नाही… नव्हते कधीच काहीच मागणे माझे तुजवीण जगणे कधीच रुचले नाही… श्वासासंगे, तुजवरी प्रेम करीत आहे तुला कधीच विसरूही शकलो नाही… तूही हे सारे, […]

बोडी आयलँड दीपगृह

दीपगृह …. सागर …. महासागरातून …. तिथल्या अनिश्चिततेतून प्रवास करणाऱ्या नाविकांचं कायम आशास्थान …. विशेष: रात्री अपरात्री जहाज चालवतांना … खडकाळ जीवघेण्या किना-यांपासून …. कल्पनेपलिकडच्या भयानक वादळांपासून सुरक्षिततेची भावना देणारं दीपगृह. उसळत्या दर्यात, रात्री बेरात्री, घोंगावणाऱ्या वाऱ्यात दीपगृहाची ही सर्व्हिस म्हणूनच खूप मोठी मानली गेल्येय. […]

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा? […]

सापाचे कान!

साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे. […]

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..