नवीन लेखन...

हेलिकॉफ्टर सरळ वर कसे जाते?

विमानाचे पहिले उड्डाण राइट बंधूंनी १९३० साली केले. असे म्हणतात की शिवकर बापूजी तळपदे यांनी त्यापूर्वी सात वर्षे मुंबईच्या चौपाटीवरून पहिले उड्डाण करुन दाखविले होते, पण त्याला मान्यता मिळाली नाही.

तळपदे यांनी विमानोड्डाणासाठी पारा वापरला होता. ज्या महर्षी भारद्वाज यांच्या विमानशास्त्र या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी हे विमान बनविले होते, त्याच ग्रंथावर आता भारतात आणि परदेशात बराच अभ्यास चालू आहे. पाऱ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून शून्य गुरूत्वाकर्षणाची स्थिती गाठता येते, असे संशोधकांचे मत आहे. पण तळपदे काय की राइट बंधू काय, दोघांच्याही विमानांना धावपट्टी लागली होती. त्यामुळेच वस्तुमान मिळून विमान पंख्याच्या सहाय्याने वर उचलले जाते.

या उलट लिओनार्डो-डा-विंची यांनी हेलिकॉप्टरचा बनवलेला आराखडा ते एकदम उर्ध्व दिशेला उडेल, असा केला. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात सिसी या शास्त्रज्ञाने यावर बरेच संशोधन केले. रशिया, अमेरिका, भारत आणि आणखी काही देशांनी बनवलेले हेलिकॉप्टर एकदम वर उडते. याला कारण डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. त्याच्या पात्यांची स्थिती बदलून हेलिकॉप्टर वर जायला रेटा मिळतो. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी वाहन-क्षमता मात्र कमी होते. त्यामुळे हेलिकॉप्टर चालक ते धावपट्टीवर थोडेसे पळवून हळूहळू वर न्यायचे पसंत करतात. पारंपारिक विमानही एकदम वर न्यायचे प्रयत्न झाले. त्यात लढाऊ जेट विमानांचा प्रयत्न सफल झाला.

इंग्लंडचे हॅरिअर हे एकदम वर न्यायचे आणि खाली उतरवायचे विमान भारताच्या नौदलात विक्रांत या विमानवाहू बोटीवर होते. विराटवरही तशा प्रकारचेच पण एम१जी-२१ जातीचे विमान आहे. या विमानाच्या इंजिनातील धूर जमिनीवर आपटून त्याला वरच्या दिशेने जायला रेटा मिळतो. परंतु मोठया किंवा मध्यम आकाराच्या विमानासाठी ही पद्धत फायदेशीर ठरत नाही. म्हणून टीआयएलटी पद्धतीच्या रोटरचा उपयोग झाला. यामुळे इमारतीच्या छपरावर विमान उतरवता येते. पण एवढ्या मोठ्या आकाराच्या गच्च्या इमारतींवर मिळत नसल्याने विमाने धावपट्टीवरच पळवावी लागतात.

– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..