नवीन लेखन...

द्विपाद पूर्वज

आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या […]

परिस्थिती

आज पाच वर्षांनी ती पुन्हा त्याला बसस्टॉपवर दिसली. गळ्यातील मंगळसूत्रावरून कळत होतं की तिचं लग्न झालंय. पाच वर्षानंतरसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, “ओळखलंस?” त्याला पाहताच तिचे मन पुन्हा पाच वर्ष मागे जाते. काही वेळ तसंच त्याला बघितल्यानंतर ती म्हणते, “हो, न ओळखायला काय झालं” तिचे हे उत्तर […]

प्राचीन कोकणातील बंदरे

व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश […]

आत्मसुख

सखे सुखवित सुखा शांत निजली यामिनी नको जागवुस आता पुनःपुन्हा स्पंदनांना गंगौघी अमृतात विरघळली अधरे तृप्तवुनी अंतरीच्या साऱ्याच संवेदनांना निष्पाप, निरागस अवीट आत्मसुखदा अव्यक्त शब्दभावनांना व्यक्त कसे करु सांगना झाला श्रावण पावन, मंत्रमुग्धली पावरी राधामीरा आळविती गीतात भक्तीभावनांना –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २९४ १६/११/२०२२

लेट व्हॅलेंटाईन

परवा माझा मोबाईल बंद पडला होता, त्यामुळे दोन दिवस मी त्याला हातही लावला नाही. आज दुरुस्त केल्यानंतर पाहिलं तर व्हाॅटसअपवर धाड धाड मेसेजेस पडत राहिले. त्यातील मी मुंबईला नोकरीला असणाऱ्या माझ्या एकुलत्या एक मुलाचा व्हाॅटसअप उघडला, तर त्याने लांबलचक पाठवलेला मेसेज दिसला. मी माझा चष्मा नाकावर चढवला व वाचू लागलो… ‘प्रिय बाबा, आज आम्ही दोघेही बाहेर […]

उगाच काहीतरी – १९

माझ्या घराजवळच्या बाजारात एक फेरी वाली बाई बसते. घरगुती वापराचे छोटे-मोठे सामान विकायला ती बाई तिथे जमिनीवर मांडून बसते. तिच्या सोबत नेहमी तिची एक चार-पाच वर्षांची लहान मुलगी असते. नवरा क्वचित काहीतरी सामान आणताना नेताना दिसतो पण शक्यतो ही बाई आणि मुलगी या दोघीच असतात. एकंदर वागण्या बोलण्यावरुन ती चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली वाटते. माझी […]

नोटांची छपाई ते वितरण

नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे. […]

नाती मृगजळी

वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा या भावनांचे आज अर्थ बदललेले उरि न उरली माया ममता ममत्व ओढ, आस्था आपलेपण विरलेले निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले इथे कुणीच कुणाचे कधीच नसती सत्य विदारक जगी पचनी पडलेले स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले — वि.ग.सातपुते […]

1 4 5 6 7 8 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..