नवीन लेखन...

नेहमीच मज हे दयाघना

मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते, नेहमीच मज हे दयाघना,–!!! लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता, संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,–!! तरीही माणूसपण असते, एखाद्या सज्जन हृदयात, माणुसकीचे महत्व जाणे, कितीही असेल संकटात,–!!! असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती, हेच प्रेम असे त्याचे, जगण्याची विशाल उक्ती,–!!! मुके […]

सावित्रीचा वसा असा (अष्टाक्षरी)

वसा आहे अवघड तरी घ्यावा झटपट थोडं तरी ज्ञानदान देण्या करू खटपट सावित्रीच्या आम्ही लेकी व्रत घेतो स्वातंत्र्याचे ठेवणार आता एकी ठेचू डाव हो दुष्टांचे जन्मदिनी सावित्रीच्या नको सोहळे भाषणे कर्तृत्वाने उजळूया दाही दिशा सन्मानाने सोसू सावू सम हाल तरी द्या जशास तसा धडा अमानुषतेला सावित्रीचा वसा असा सौ.माणिक शुरजोशी नाशिक

समथिंग डार्क इन ब्लॅक

कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब. बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती. […]

सोनसळी चोळी माझी

सोनसळी चोळी माझी,वरती बिलोरी ऐना, भल्या भल्यांची अरे राजा, करते कशी मी दैना, पिवळाजर्द घागरा माझा, त्यावर नक्षीदार बुट्टे भोवती चंदेरी ओढणी, त्यावर निळेशार चट्टे,–!!! शेलाटी अंगकाठी, आखीव की बांधा, नाजूक नार नवेली, होईल प्रीतिची बाधा,–!!! नाक माझे चाफेकळी, रंग गोरा गोरा, पाहणारा हरखून जाई, असाच रंगेल तोरा,–!!! केतकी स्पर्श माझा, मृदू मुलायम चंपाकळी, जो तो […]

खल्वायन रत्नागिरी

सर्व प्रतिभावान कलाकारांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या संस्थेला वर्धिष्णू स्वरूप लाभावे , बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे , तो विशाल व्हावा आणि आसमंत संगीताच्या इंद्रधनुषी रंगाने व्यापून जावा यासाठी , संस्थेचे आद्यदैवत असणाऱ्या श्री नटेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!! […]

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत, गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,–!!! केवढे त्यांचे गारुड हे, अंतरीची खूण पटत, त्यांच्यापुढे आपण केवढे, सिंधुतील अगदी बिंदूगत,–!!! प्रखर त्यांचे तेज असे , भुरळ पाडे चमचम चमक, हरेक कर्तव्यकठोर असे, असे प्रत्येकजण बिनचूक,–!!! आपली जागा ठाऊक असे, राहती किती स्थितप्रज्ञ , अवकाश केवढे मोठे, धीराने त्यास तोंड देत,–!!! प्रवास, दिशा, […]

आनंदाच्या हिंदोळ्यावर (लावणी)

आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।। नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।। अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।। उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।। राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।। साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।। विरहणीची व्यथा न्यारी, अजून तुम्हा ना कळली […]

चमत्कार को नमस्कार ! (नशायात्रा – भाग २)

काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सर्वांसमोर हाताची मुठ उघडली तर त्यांच्या तळहातावर एक लाल मणी होता तो त्यांनी एका माणसाला समोर बोलावून दिला व त्याला सांगितले मणी सतत शरीराला लागून राहील असा परिधान कर तुझे काम होईल …नंतर मला समजले की तो मणी त्यांनी हातातून जादूने काढला होता ..( ती हातचलाखी होती हे खूप नंतर लक्षात आले माझ्या ) […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  घरटे बांधून गेल्या त्या खेळूनी नाचूनी उड्या मारूनी,  चिव चिव करित गात होत्या झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवीती हलके हलके दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके संसार चक्र ते भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे सोडूनी अल्प […]

1 15 16 17 18 19 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..