नवीन लेखन...

जन्मभूमीपासून दूर, मातृभूपासून वंचित

जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित, लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,—!!! उठे स्मृतींचे मोहळ, स्मरणांच्या माशा डंसत, भारतीय म्हणून मी,—- झुरतो तिच्यासाठी अविरत,—!!! थांबे ना कुणासाठी काळ , मागेमागे धावे मन, आलो जेव्हा परदेशात, उदास होतो आत उरांत,—!!!! खडी करण्या कारकीर्द, मनात होती खूप उमेद, आईपासून तुटले मूल , सारखी जिवा वाटत खंत,–!!! नीतिमंत तो भारतीय , असे […]

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी – भारताची भुमिका

१९३३ मध्ये सध्याचे दलाई लामा म्हणजे ज्ञानाचे सागर असलेले तेन्झिन ग्यात्सो यांची नियुक्ती झाली. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्षही झाले. चीनने कुरापती काढून १९५५पासून तिबेटवर आक्रमण करण्यास आणि हक्क सांगण्यास सुरुवात केली. दलाई लामांनी नियुक्त केलेल्या पंचेन लामांचे पद चीन सरकारने १९९५ साली बरखास्त केले. त्यांच्या जागी त्यावेळी सहा वर्षांच्या बेनकेन एरदिनी या बालकाला बसवले. त्यानंतर चीनने जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या तिबेटवर कडक निर्बंध लादले. […]

महानायिका

हो!!!! हो मी महानायिका बोलतेय नाव माझे सावित्रीबाई माझी जन्मदात्री लक्ष्मीआई ३जानेवारीला सुदिन उगवला खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास “पहिली धनाची पेटी”चा मान मिळाला. आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला. हो !!!!!!! हो मी महानायिका बोलतेय उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला. संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला. हो!!!! हो मी महानायिका बोलतेय मी तर ज्ञानदानाचा […]

श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ४

अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !! प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं ! कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!! अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन. चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, […]

तारकापुंजाची ताराराणी

तारकापुंजाची ताराराणी, ऐकते तुझे मनोगत, कथा व्यथा सारी कहाणी, समजते ग मज नकळत, –!!! रंग तुझा चमकदार, दुधी, पसरत नभी मंद प्रकाश, उजळतेस कशी आकाशी स्वयंप्रकाशी झगमग झगमग,–! चंद्रराजाच्या जनानखानी, अस्तित्व कसे तुझे ठळक, किती राण्या असून भोवताली, तुझ्यावर त्याची मेहरनजर ,–!!! तरीही भासशी किती एकाकी, काय सोसशी अंतरी दुःख, तोंड मिटुनी गप्प राहशी, कधी लपवत […]

फांदीवरती बसलो मी

फांदीवरती बसलो मी, पिसारा आपला जुळवुनी, बघतो साऱ्या सृष्टीला, एकवार पुन्हा निरखुनी,—!!! हिरव्यागार या रानी, मजला दिसे समृद्धी, जीवन इथेच रमुनी जाई, शांतता वाटे अंत:करणी,–!!! भाईबंदांच्या येतां आठवणी, मन जाते कसे हेलावुनी, कोण कुठल्या दिशेला नेला, निष्ठुर या माणसांनी,–!!! सौंदर्याचे जिवंत दाखले, कैद ते का असे करिती,–? आम्ही तर लेकरे निसर्गाची, मग शाप आमुचे भोगती,–!!! स्वातंत्र्याची […]

नववर्ष (हायकू)

*हायकू* नववर्ष *१* सु स्वागतम् द्वि सहस्त्र वीसात हो सुफलाम् *२* गरुड झेप घे या नव वर्षात दे स्वर्ण लेप *३* सुर जुळावे तन-मन-धनाचे सुख लाभावे *४* प्रभा फाकता कलरव हो झाला वर्ष -स्वागता *५* या पायघड्या घालते रे स्वागता आता ये गड्या *६* झाले स्वागत मोहरता लेखणी नव वर्षात — सौ.माणिक शुरजोशी

आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !

आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं  हेच आसन !  फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला ! […]

 देह देव

हाडे, मांस, रक्ताने शरीर बनविले छान सौंदर्य खुलते त्या देहाचे जर असेल तेथे प्राण   प्राण नसे कुणी दुजा हा परि आत्मा हेची अंग विश्वाचा जो चालक त्या परमात्म्याचा भाग   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं प्रेमभरे देह भजावा अंतर बाह्य शुद्धता राखित समर्पणाचा भाव असावा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

उघडेल कधी दरवाजा

उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल, संपतील तणाव चिंता, स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, —- मोल देत कसा नाचेल , भरारी घेत आभाळा, उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना, सतत रुंजी घालत राहील,— इवल्याशा त्याच्या मनात, *मुक्तीचा आनंद भरेल, विश्वास ठेवू तरी कसा, मनी भावना उफांळेल,— सुटली ही भयानक कारा ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां, […]

1 16 17 18 19 20 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..