नवीन लेखन...

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं,  आठवत नाही मला रचली होती एक कविता,  त्याच प्रसंगाला जल्लोषांत होतो आम्हीं,  दिवस घातला आनंदी खिन्नतेचा विचार त्या दिनीं,  शिवला नाही कधीं नाच गावूनी खाणेंपिणें,  सारे केले त्या दिवशीं बेहोशीच्या काळामध्यें,  कविंता मजला सुचली कशी छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते प्रसंग जरी तो मरून गेला,  कविता जिवंत राहते डॉ. […]

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी […]

रुद्रा – कादंबरी – भाग २

रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या,  चखणा म्हणून  खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता.  […]

सौंदर्यवर्धक संत्री साल

हल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो . […]

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करिते शरिराचा वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला शरिर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना,  असती पूरक दुजाला साध्य […]

बारामुल्ला दहशतवाद मुक्त होताना..

गेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्‍या काश्मीर खोर्‍यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्‍यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे. […]

अनुराधा नक्षत्र

सत्तावीस नक्षत्रांपैकी 17 व्या क्रमांकाचे हे नक्षत्र. अनुराधा हे नावच स्त्रीलिंगी आहे. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही मातृत्व जागरूक आणि जागृत असलेली असते. मृदू स्वभावाच्या या नक्षत्रावरील जन्मलेल्या व्यक्ती या पृथ्वीतत्त्वाचा असल्यामुळे यांनी शीतरंग हे वस्त्र प्रावरणाच्या रंग निवडीत अधिक प्रमाणात उपयोगात आणावेत. निळा मोरपंखी हिरवा हॅलो आकाशी लीफ ग्रीन आणि कधीतरी सप्ताहातून एखादे वेळेस लालसर […]

आरोग्यपूर्ण आयुर्वेदिक चहा…अर्थात भारतीय “कषाय”

सकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया. […]

माझे गाव हरवले आहे !

आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. […]

आशेशी संवाद

कापलेले पंख अन्, तोडलेले हातपाय, विचारेना इथे कुणी, देईना धरणी ठाय,–!!! काय करू, जाऊ कुठे , मन विषण्ण होई,— सांगायाची कोणाला आपुली कर्मकहाणी,–!!! जग सारे पसरलेले, चालते आहे एकटी, स्थिती अगदी अनवाणी, रणरणत्या वाळवंटी,–!!! ‌पाखरा किती गोंडस तू, गोडुली तुझी वाणी, आधार देई मम बुडती’ला, देऊन काडी काडी,–!!! *निराशेच्या गगनीही, आशेचा पक्षी उडे, संगतीला मी तुझ्या, […]

1 14 15 16 17 18 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..