माझे गाव हरवले आहे !

माझा जन्म ठाण्यात झाला. जांभळी नाक्यावर सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाताना अनोळखी चेहरे फार अभावानेच दिसत असत. आमच्या खारकर आळीत प्रत्येक घर त्यातील माणसे परिचयाची होती. नवीन आलेला माणूस चटकन ओळखू येत असे. नौपाडा, विष्णूनगर हे भाग सुद्धा असेच होते. गावाला एक ओळखीचे संरक्षण होते. कुणीही कोणतेही गैर कृत्य केले तरी तो कोण कुठला हे लगेच समजत होते. एक प्रकारची SECURITY होती .

आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. सोसायट्या झाल्या, मोठमोठी संकुले उभी राहिली. शेजारचा माणूस सुद्धा कोण कुठला माहित नसतो. इमारतीत अनोळखी माणसे,  रस्त्यावर अनोळखी माणसे, व्यापारी अनोळखी, फेरीवाले अनोळखी.. सर्वच नवे वाटतात..

जणूकाही आपणच आपले गाव सोडून दुसर्‍या प्रांतात राहतोय कि काय असे वाटत आहे. भयानक फसवणूक वाढली आहे. रिक्षा असोत व ओला उबर,  सर्वच चालक अनोळखी …

कुठून आली ही माणसे हेच समजत नाही. गल्लो गल्ली दुकाने, झोपड्या,  टपर्‍या,  त्यात राहणारी, काम करणारी अनोळखी माणसे पाहून कधी कधी नवल वाटते. ही माणसे त्यांचे गाव सोडून इथे का म्हणून राहतात हेच समजत नाही. त्यातल्या त्यात उत्तरेकडील राज्यातील माणसांनी तर या शहराची भयानक अवस्था केली आहे.

मराठी संस्कृती,  भाषा,  सणवार,  हे सर्व गावाच्या गावपणाबरोबर संपले आहे.

हे ठाणे आता माझे राहिले नाही ………..!!!!!

चिंतामणी कारखानीस

Avatar
About चिंतामणी कारखानीस 74 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…