वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करिते शरिराचा
वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१,

उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट
परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२,

मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते
मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३,

नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला
शरिर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४

एक इंद्रियाची वासना,  असती पूरक दुजाला
साध्य करण्यासाठीं हेच,  जागृत ठेवावे मनाला…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 



Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1466 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…