तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं.

त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर भारतीय अध्यात्म या विषयावरही त्यांनी लेखन केलं होतं.

सार्थ श्रीमत् दासबोध, अध्यात्म दर्शन, आनंद साधना, भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत, भावार्थ भागवत, ज्ञानेश्वरी, मनाची शक्ती, नामसाधना परमार्थ प्रदीप, प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद, साधकांसाठी संतकथा, शरणागती, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अंतर्यात्रा, ईश्वरभक्ती दर्शन अथवा प्रेमयोग, श्रीचैतन्य गीता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

केशव विष्ण बेलसरे यांचे ३ जानेवारी १९९८ रोजी निधन झालं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2156 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…