नवीन लेखन...

‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर

१९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले. […]

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी […]

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये रोजी झाला. जॉय अॅडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या. एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन […]

प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर

प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर यांचा जन्म ३ जानेवारी १९६१ रोजी झाला. राजेंद्र खेर हे, आपले आजोबा द. म. खेर आणि वडील भा. द. खेर यांच्या लेखनाचा वारसा पुढे चालवणारे लेखक म्हणून ओळखले जातात. एक विशेष योगायोग म्हणजे ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ हे त्यांचं पहिलं पुस्तक त्यांच्या वडिलांच्या, भा. द. खेरांच्या ‘पूर्णाहुती’ या १०० व्या पुस्तकाच्या प्रकाशानाच्या सुमारासच प्रसिद्ध झालं होतं! […]

भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह

भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचा जन्म ३ जानेवारी १९३८ रोजी झाला. राजस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांना जसवंतसिंह राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही […]

अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा

अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला […]

दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ लाहोर येथे झाला. चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेल्या चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट […]

संजय खान

संजय खान यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.’दस लाख’,’एक फूल दो माली’,’इंतकाम’,’उपासना’,’मेला’,’नागिन” सोना चांदी’,’काला धंधा गोरे लोग’हे […]

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..