नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक विनायकराव पटवर्धन उर्फ पटवर्धनबुवा यांचा जन्म २२ जुलै १८९८ रोजी झाला.

विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायन गुरू होते. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते लाहोर येथे गेले व तिथे त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर व पुणे येथे रामकृष्णबुवा वझेयांचेकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला. पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गांधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले. ग्वाल्हेर शैलीच्या गायनाचे वैशिष्ट्य असलेल्या संगीत रागांना सहज सोप्या पद्धतीने गाण्याचा कल त्यांच्या गायनातून अधोरेखित होत असे.. विनायकराव हे त्यांच्या तराण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची भजन गायनाची शैलीही निराळी होती. त्यांनी ‘राग विज्ञान’ (सात खंड), ‘नाट्य संगीत प्रकाश’ आणि ‘महाराष्ट्र संगीत प्रकाश’ ही पुस्तके लिहिली. त्यांनी जवळपास १० वर्षे अनेक मराठी संगीत नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रख्यात कलाकार बालगंधर्व यांच्या जोडीने ते रंगमंचावर वावरले. पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ सोव्हियेत संघ, पोलंड वचेकोस्लोव्हाकिया या राष्ट्रांचा दौरा करून आले होते. विनायकरावांना १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विनायकराव पटवर्धन यांचे २३ ऑगस्ट १९७५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..