मराठी अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याचा जन्म ६ सप्टेंबर १९८६ रोजी झाला.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्याची ही मालिका खूपच गाजली होती. तसेच त्याची आशू ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
या मालिकेत त्याच्यासोबत अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर हे कलाकार पाहायला मिळाले. त्याने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपटा मध्ये देखील पदापर्ण केले आहे. बुधिया सिंग: बॉर्न टू रन असे या चित्रपटाचे नाव होते.
‘दिल दोस्ती दुनियादारी’सारखी मालिका आणि ‘बापजन्म’, ‘मंत्र’ अशा सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता पुष्कराज चिरपुटकर फारसा कुठे दिसत नव्हता. आता आगामी ‘मी वसंतराव’ या चित्रपटात तो मोठ्या पडद्यावर दिसेल. यात तो पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
पुष्कराज चिरपुटकर ने विठ्ठल नामाचा गजर शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर केले आहे.
-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply