संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी...
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

वाहतो ही दुर्वांची जुडी – अजरामर मराठी नाटक

लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व. १९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात […]

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री रीमा लागू

रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना मा.रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा […]

मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. […]

नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक चंद्रकांत गोखले

अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून […]

निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य

चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शक म्हणून ‘तिसरी कसम’ मधून आपला वेगळा ठसा उमटवला. ‘तिसरी कसम’ला १९६६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं. पुढे १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांनी समांतर चित्रपट चळवळीत अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश असे काही चांगले चित्रपट दिले; मात्र ‘तिसरी कसम’ची सर त्यांना आली नाही.बासू […]

ख्यातनाम अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल देव-कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम […]

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील […]

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक […]

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर […]

जागतिक संगीत-दिन(वर्ल्ड म्युझिक डे)

जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, […]

1 2 3 105