नवीन लेखन...

आजचा विषय मटार

थंडीच्या मोसम चालू झाला या मोसमात बाजारात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. जेवणात हिरव्या मटारच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मटार-पनीर, मटार-पुलाव, आलु मटार, मटाराचे कटलेट यासारखे विविध खाण्याचे स्वादिष्ट प्रकार मटारापासून बनवता येतात. लो कॅलरी आणि अनेक पौष्टिक तत्वे असलेल्या मटाराचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या मटाराचे लठ्ठ व्यक्तिंनी अवश्य सेवन करावे. मटारातील […]

पेरुपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो. […]

पपईपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे. […]

चिकूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. […]

बोरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे. […]

कोकणची ‘चाव-दिसाच्या फॉवा’ ची आगळीवेगळी परंपरा

सिंधुदुर्गातली दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाच झपाट्यान शहरीकरण होत असतानाच फराळासाठी केल्या जाणाऱ्या ”चावदिसाच्या फॉवा” ची परंपरा आजही टिकून आहे. दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात सकाळी फराळ करतांना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. […]

कुठलं खाद्यतेल वापराल?

फोडणीसाठी देशी गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप वापरावं हे आपण या आधी पाहिलं. तरीही ज्यांना तूप न वापरता तेलच वापरायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत. कुठलं तेल वापराल? आजकाल आम्हाला ऑलिव्ह ऑइल खूपच ‘हेल्दी’ असतं असा साक्षात्कार झाला आहे. उठसुठ सगळ्या पदार्थांत आम्ही हे महागडं तेल वापरतोय. प्रत्यक्षात ज्या देशांतून हे तेल आपल्याकडे […]

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?! काहींना हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले असेल. फोडणीसाठी तेलच वापरले जाते हे आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असलेले उत्तर. त्या तेलातही सोयाबीन वापरावे की सूर्यफूल अशा प्रश्नातच आम्ही बुडालेले असतो. मात्र मुळात फोडणीसाठी तेलच वापरावे का अन्य काही पर्याय आहे? याचा विचारदेखील आमच्या मनाला शिवत नाही. फोडणी देताना नेमकी काय प्रक्रिया होते? […]

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]

बेबी कॉर्न

आजचा विषय बेबी कॉर्न मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. […]

1 7 8 9 10 11 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..