कोकणची ‘चाव-दिसाच्या फॉवा’ ची आगळीवेगळी परंपरा
सिंधुदुर्गातली दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाच झपाट्यान शहरीकरण होत असतानाच फराळासाठी केल्या जाणाऱ्या ”चावदिसाच्या फॉवा” ची परंपरा आजही टिकून आहे. दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात सकाळी फराळ करतांना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. […]
