जीवाची (की जिभेची?) मुंबई
मुंबईत खाबुगिरीसाठी जागांची कमतरता नाही. वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या चवींच्या अक्षरश: सगळ्या खाद्यपदार्थांची उपलब्धता मला वाटते मुंबईशिवाय भारतातल्या कोणत्याही शहरात नसेल. मुंबईचे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे तुमच्या खिशात किती पैसे खुळखुळतायत त्यावर वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. अगदी गाडीवरच्या वडा-पाव पासून पंचतारांकित हॉटेलमधल्या मल्टी-कोर्स जेवणापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतात. आतातर गाडीवर चायनिज आणि कॉन्टिनेन्टल पदार्थही मिळतात. […]
