नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद्गीता : अ. २ श्लोक १३

गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
[…]

आनुवंशिक तत्व आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद.

१२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ या बोटीवरून, ५ वर्षांच्या काळासाठी, १८३५ साली, जगप्रवासाला निघाला. या काळात, आर्किडपासून व्हेलपर्यंतच्या प्रजातींचा त्याने अभ्यास केला, स्वत:च्या अचाट बुध्दीमत्तेचा वापर करून आणि खूप मेहनत घेऊन नोंदी केल्या. पुढील  २०-२५ वर्षे मनन करून, १८५९ साली ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ हा ग्रंथ, त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी लिहीला. या पुस्तकात त्याने, ‘नैसर्गिक निवड’ या तत्वावर आधारलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडला.
[…]

अतीसामान्य पण असामान्य :: सजीवांची त्वचा, कातडी, फळांची सालपटे वगैरे.

सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व सजीवांचे बाहेरचे आवरण आहे. प्रत्येक प्राण्याची कातडी आणि तिचे सौंदर्य अप्रतीम, वैशिष्ठ्यपूर्ण असते. तिच्यावरील रंगाविष्कार अवर्णनीय आहेत. पोपटांचे, मोराचे रंग, वाघ, जिराफ, झेब्रांचे पट्टे, चित्त्यांचे ठिपके यांना जबाब नाही. कातडीवर केस असतात.
[…]

मानवी शरीरातील सप्तचक्रे आणि अंतस्त्रावी ग्रंथी.

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल,या चक्रांच्या शरीरातील जागा, चक्रांचे गुणधर्म आणि त्यांच्या कार्यांचा, शारीरिक व्यवहारातील सहभाग सांगितला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, मानवी शरीरातील सात अंतस्त्रावी ग्रंथींच्या जागा, त्यांचे कार्य आणि सात योगिक चक्रांच्या जागा यात कमालीचे साम्य आढळते.
[…]

सजीवांची झोप

माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच निद्राही सजीवांना आवश्यकच असते. अगदी युध्दआघाडीवर असलेल्या सैनिकांचीदेखील पुरेशी झोप झाली नाही तर ते सक्षमदृष्ट्या लढू शकणार नाहीत. थकल्याभागल्या जीवांना, लहानशी डुलकी जरी काढली तरी, ताजेतवाने वाटते.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता : अध्याय २, श्लोक २२.

आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व (जेनेटिक मटेरियल) हाच आत्मा असतो. त्यामुळे तो अणूरूपच आहे. या विश्वाची निर्मिती हे वास्तव आहे. या निर्मितीस जे काही कारणीभूत आहे तोच ईश्वर असे वैज्ञानिक मानतात. पण तो, अध्यात्मात वर्णन केल्यानुसार नाही असेही मानतात. कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन, कल़्शियम, फॉस्फोरस वगैरे सारख्या अचेतन मूलद्रव्यांपासून, सजीवांचे चेतनामय शरीर ज्या कारणामुळे निर्माण होते तो आत्मा असे वैज्ञानिक मानतात. आनुवंशिक तत्व हे आत्म्याचे वास्तव स्वरूप आहे.
[…]

बालगंधर्व

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
[…]

अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्‍यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
[…]

सजीवांतील संदेशवहन

या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती निर्माण होऊन त्यांच्या सजीवांची संख्या वाढावी यासाठी निसर्गाने, काळजीपूर्वक भक्कम तजवीज करून ठेवली आहे.

सजीवांनी, आपले विचार एकमेकास कळविणे आणि ते विचार त्यांना कळणे, या साठी निसर्गाने, कोणती आणि कशी यंत्रणा सिध्द केली आहे, ते या लेखात वाचा.
[…]

1 94 95 96 97 98 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..