गुणसंपन्न बोर
शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.
[…]
शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.
[…]
खेळ वा संस्थेपेक्षा व्यक्तीस महत्त्व येते आणि नंतर तर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की ती व्यक्ती म्हणजेच खेळ वा संस्था असे मानले जायला लागते. हे मागास समाजाचे लक्षण आहे आणि आपल्याकडे ते अनेक क्षेत्रांबाबत पाहायला मिळते.
[…]
रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
[…]
ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
[…]
भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
[…]
या विश्वात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही किंवा कोणताही परिणाम कारणाशिवाय दिसत नाही. कार्य घडल्याशिवाय किंवा कोणतीतरी उर्जा खर्ची पडल्याशिवाय कार्यवाही होऊ शकत नाही. हे कारण किंवा सहभागी झालेली उर्जा कळली नाही तर घडणारी घटना किंवा दिसणारा परिणाम, चमत्कार वाटतो पण ते खरे नाही. या संबंधीच या लेखात चर्चा केली आहे.
[…]
दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. पण थोडा विचार केला की लक्षात येते की तो प्रसंग किंवा ती घटना इतकी असामान्य असते की ती आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली आहे.
[…]
ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.
पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.
हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.
पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.
.
[…]
न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.
[…]
१९७१ ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
लेखकःसुरेन्द्रनाथ निफाडकर
पृष्ठसंख्याः 112 ; किंमतः 100 रू.
नचिकेत प्रकाशन, नागपूर
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions