नवीन लेखन...

विज्ञान आणि अध्यात्म : कार्य, घटना, परिणाम वगैरे

रविवार १९ फेब्रुवारी २०१२.

जेव्हा मानवाचा मेंदू फारसा प्रगत झाला नव्हता तेव्हा त्याला सूर्योदय, चंद्रोदय, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण,इंद्रधनुष्य, भरतीओहोटी, विजांचा कडकडाट वगैरे चमत्कार वाटायचे आणि ईश्वरच या घटना घडवितो अशी त्याची ठाम समजूत होती. धर्मग्रंथातही हेच सांगितले आहे. भयानक पाऊस, नद्यांचे महापूर, वादळे, धरणीकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, वणवे, मृत्यू वगैरे आपत्ती, ईश्वरी कोपामुळे होतात. देवाला प्रसन्न केले की या आपत्ती टळतात असेही धर्मग्रंथात लिहीले आहे.
आता विज्ञानाने या सर्व घटनामागील बराचसा कार्यकारणभाव शोधून काढला आहे. विश्वातील सर्व घटनांचा कार्यकारणभाव नेमका समजला आहे असेच नाही आणि विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानाने, मानवाला कळलेले विज्ञान नगण्य आहे याचीही जाणीव शास्त्रज्ञांना आहे.

 
घटना :: या अख्ख्या विश्वात कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही किंवा कोणताही परिणाम दिसत नाही. रात्र संपून पहाट होते, अंधार संपून प्रकाश येतो, झोप संपून जाग येते, सजीवांची दिनचर्या सुरू होते, सूर्योदय होतो, जगरहाटी नेहमीसारखी सुरू होते, कालचा दिवस संपलेला असतो, आजचा दिवस उगवलेला असतो.
<परिणाम ::

<कारण ::

<कार्य ::

आगपेटीच्या खडबडीत पृष्ठभागावर काडी नुसती टेकविली तर काहीच क्रिया घडत नाही. किंवा गॅसमध्ये नुसती काडी धरली तर गॅस पेटत नाही. खडबडीत पृष्ठभागावर काडी जोरात घासावी लागते किंवा गॅसमध्ये पेटलेली काडी धरावी लागते तरच आगपेटीची काडी पेटते किंवा गॅस पेटतो. म्हणजे घटना घडविण्यासाठी कोणते तरी कार्य करावे लागते किंवा कार्य केले जाते.
थोडक्यात म्हणजे, कारणाशिवाय आणि कार्य केल्याशिवाय कोणतीही घटना घडत नाही, घटना घडली नाही तर परिणाम दिसत नाही आणि कारण, घटना आणि परिणाम यासाठी कोणत्यातरी स्वरूपातील उर्जा खर्ची तरी पडते किंवा बाहेर तरी पडते.
हे कारण समजले नाही, केलेले कार्य दिसले नाही किंवा समजले नाही, किंवा सहभागी उर्जा कळली नाही तर घडणारी घटना किंवा दिसणारा परिणाम म्हणजे चमत्कार वाटतो. पण ते खरे नाही.
<घटना स्थळ ::

<घटना काळ ::

<घटना उद्देश ::

<विश्वनियम अनुलंघनीय ::

इतिहासात अनेक व्यक्तींनी अनेक चमत्कार करून दाखविल्याचे आपण ऐकतो. याचे कारण म्हणजे लोकांना त्या घटनामागील कार्यकारणभाव समजला नाही किंवा समजू दिला गेला नाही. धर्मसंस्थापक, रुशीमुनी, भूतकाळातील महान विचारवंत, साधूसंत यांच्या चरित्रात अनेक चमत्कारांची वर्णने आहेत. अनुयायांना विचारवंतांचे विचार नीट तर्‍हेने कळावेत आणि त्यानुसार सामान्य जनतेने सत्शील आचरणे करावीत म्हणून त्या चमत्कारांचा वापर केला असावा.
उदाहरण द्यायचे झाले तर म्हणता येईल की टीव्ही समोर एक माणूस रिमोट घेउन बसला आहे. तो चॅनेल बदलवितो, आवाज लहानमोठा करतो, टीव्ही बंद करतो पुन्हा लावतो वगैरे क्रिया कशा घडतात याचा कार्यकारणभाव आपल्याला चांगला माहित आहे. परंतू ज्याला हे माहित नाही त्याला ही भुताटकीच किंवा चमत्कारच वाटेल.
तर असा आहे घटना, परिणाम, कारण, कार्य, घटनास्थल, घटनाकाळ, घटनाउद्देश वगैरेंचा परस्पर संबंध.
शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..