नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवतगीता : अध्याय २ : श्लोक १६.

गीता लिहून ५ हजार वर्षे झाली आहेत. या काळात हजारो विचारवंतांनी, गीतेतील श्लोकांचा, त्यांच्या बुध्दीला भावेल असा अर्थ लावला आहे. आणि तो अधिकारवाणीने जनतेला सांगितला आहे याची कृपया नोंद घ्यावी. यातला नेमका कोणता आशय, महर्षि व्यासांना अभिप्रेत होता हे समजणे कठीण आहे. आता, गीतेत विज्ञान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बरेच शास्त्रज्ञ असाच प्रयत्न करीत आहेत. तरीपण त्यांच्या दृष्टीकोनात फरक असणारच.
[…]

शिक्षण क्षेत्रातील दुकानदारी बंद करा !

सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले असले तरी ते देण्यासाठी शाळांचे आणि अन्य सुविधांचे जाळे सरकार उभे करू शकणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने या मुलांना शिक्षणाचा हक्क कायद्याने बहाल केला असेल तर त्या हक्काचे जतन करण्याची जबाबदारीदेखील सरकारने घ्यायला हवी. सरकार आपल्या स्तरावर ही जबाबदारी उचलू शकत नाही, हे स्पष्टच आहे आणि म्हणूनच खासगी शिक्षण संस्थांना अनुदान देऊन शाळा स्थापन करण्याची परवानगी सरकार देत असते.
[…]

भारत-पाक अणु युद्धामुळे जागतिक दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल ?…..एक पाहणी निष्कर्ष .

भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवती भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील. ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.
[…]

वादग्रस्त एनसीटीसी…

देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय?  यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय? 
[…]

सरकार राशन माफियांचे!

सरकारला या देशातील शेतकर्‍यांचे, गरिबांचे खरोखर हित साधायचे असेल, तर या लोकांकरिता सरकारी तिजोरीतून खर्च होणारा प्रत्येक रुपया या लोकांच्या दारापर्यंत कसा जाईल, याचा विचार करावा लागेल. त्यासाठी आधी सरकारने सगळ्या फुकटछाप योजना तातडीने बंद करायला हव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती तरी व्हायला हवी किंवा एखादी क्रांती तरी!

[…]

व्यथा !

निसर्गावर प्रेम केले तर तो सर्व देतो, निसर्ग हा देवासमान मनाला पाहिजे.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..