नवीन लेखन...

निरंजन – भाग ४६ – रहस्य!

गुरुंची साथ मिळालेल्या शिष्याचा उद्धार हा निश्चित स्वरुपात होणारच. त्याच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्याला जिवनामधल्या संकटांना सुक्ष्म रुपात पाहण्याची एक अलौकीक दॄष्टी मिळते. आणि आपल्या शिष्याला त्याच्याही कळत-नकळत त्याच्यातील अवगुणांपासुन त्याची सुटका करणे हे साक्षात सदगुरुचं वैशिष्टय….

प्रत्येकाला आपल्यातील सदगुणाचं कौतुक तर वाटतच, पण अवगुणांचा स्विकार मात्र सहसा होत नाही. “माझ्यात हा दोष आहे आणि तो मी कसा दुर करु शकतो”, असे विचार फार कमी जणांना उद्भवतात. असाच एक संत तुकारामांचा शिष्य माधव…ज्याला एक प्रश्न सदैव सतावत असे की, “मी माझ्या स्वभावात कसा बदल घडवु शकतो”. त्याचा मुळ स्वभाव हा अतिशय रागीट असा होता. एखाद्याने काही बोलले, काही साधे विचारले तरी त्याला राग यायचा.  पण मनोमन त्याला याची जाणिव देखील होती की, मी अचानक असा कसातरी वेगळाच वागतोय. त्याच्या या रागामुळे त्याने आपल्या आयुष्यात खुप काही गमावले होते. स्वतःच्या नोकरी-व्यवसायात नुकसान केले होते. जवळच्या नातेसंबंधामध्ये तसेच मित्रमंडळींमध्ये, अश्या ज्या-ज्या ठिकाणी तो वावरत असे, तिथे त्याच्याबद्दल वेगळेच गैरसमज निर्माण झाले होते. त्याच्या या वर्तणुकीमुळे लोकं त्याच्याशी फार कमी बोलत असत. त्याच्यापासुन दुर राहत. पण एक फार मोठे वैशिष्ट्य ते असे की हा माधव, संत तुकारामांशी म्हणजेच आपल्या गुरुंशी मात्र अतिशय आदराने वागे. कदाचित आपल्या गुरुंच्या सकारात्मक ध्यानशक्तीच्या वलयांमध्ये त्याच्यातील क्लेशी वर्तणुक लुप्त होत असावी. परमानंदाच्या आनंदात सतत खेळत राहणाऱ्यांकडुन अविश्वसनीय असं काहीतरी घडतच. संत महात्मांचा, ॠषीमुनींचा सहवास हा इतका सुंदर असतो की, व्यक्तीच्या स्वभावात, सवयीत आणि वर्तणुकीत बदल हा घडतोच.

एकदा माधवाच्या मनात आले की, आपण आपला हा प्रश्न आपल्या गुरुमहाराजांना विचारावा. त्यांना नक्कीच यावरचा उपाय माहीत असणार. म्हणुन एके दिवशी माधवाने सर्व शिष्यमंडळी येण्याच्या आधीच उपस्थिती लावली. आल्या-आल्या संत तुकारामांना नमस्कार केला आणि त्यांच्या समोर बसला. संत तुकारामांना मात्र प्रश्न विचारण्याच्या आधीच संकेत मिळाला होता. पण तरिही त्यांनी अजाणतेने विचारले, “काय माधवा? आज इतक्या लवकर कसे काय? माधव म्हणाला, “महाराज, काही नाही, फक्त एक प्रश्न विचारण्यासाठी आलोय. “हो का?” कोणता प्रश्न? संत तुकाराम हसत म्हणाले. माधव म्हणाला, “महाराज, मला तुमच्या या शांत स्वभावाचं रहस्य जाणुन घ्यायचयं. तुम्ही कधी कोणावर रागवत नाही, कधी चिडत नाही, आपल्या शत्रुंशी देखील मायेने वागता. हे सर्व तुम्हाला कसं जमतं. मला ही माझ्यात असा बदल करुन घ्यायचा आहे, म्हणुन विचारतो. तुकाराम महाराज म्हणाले, “आता याचं रहस्य मी नंतर तुला सांगेन, आधी माझं ऐक, मला तुझ्या आयुष्याबद्दल एक रहस्य कळलयं. माधवाला हे ऐकून उत्सुकता वाटली. त्याने लगेच विचारले, “कोणतं रहस्य, आणि तेही माझ्या आयुष्याबद्दल?? संत तुकाराम महाराज गांभीर्याने म्हणाले, “तुझं जीवन आता फक्त सात दिवस उरले आहे माधवा”, हे ऐकून काय बोलावे हे माधवाला कळलेच नाही. तो नरमला. कासावीस झाला. आणि तसाच तो भजन-कीर्तन घेऊन घरी निघून गेला. त्याचं बोलणं अतिशय मृदू झालं. त्याची वर्तणूक बदलली. इतरांशी त्याचं बोलणं देखील सुधारलं.  माणसं जोडण्याची गरज त्याला वाटू लागली. सात दिवसांमध्ये माधवमध्ये अतिशय बदल घडून आला. शेवटच्या दिवशी माधव आपल्या गुरुंना शेवटचे भेटायला आला. त्याने तुकारामांना आल्या-आल्या नमस्कार केला. तुकारामांनी त्याला आशीर्वाद दिला. त्याचे पाणावलेले डोळे पाहून संत तुकाराम म्हणाले, “बाळा, दुःखं देऊ नकोस, जे मी तुला सांगितलं, ते तुझं नाही, माझ्या शांत स्वभावाचं रहस्य होतं, जे तु त्यादिवशी मला विचारलं होतंस. जर आपल्याला मिळालेले हे जीवन कधीही संपू शकते, मृत्यू आपल्याला केव्हाही मिठीत घेऊ शकतो, मग अशा या रागीट स्वभावामुळे आणि वाईट वर्तणुकीमुळे आपण काय मिळवणार. आपण सर्वजण एकाच परमेश्वराशी निगडित आहोत. एकाच परमेश्वराची बाळं आहोत. स्वतःवर आणि इतरांवर मग राग करून आपण आपल्याच परमेश्वराला दुःख दिल्यासारखं आहे. हे सदैव लक्षात ठेव. माधवाला सारे काही स्प्ष्टपणे कळाले. आणि आनंदाने श्रीरंगाचे किर्तन सुरु झाले.

अश्या प्रकारे माधवाच्याही नकळत संत तुकारामांनी त्याच्यातला हा दुर्गुण दुर केला…..हे होतं गुरुंचं रहस्य!

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..