नवीन लेखन...

निरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”

वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्‍याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो.

घर हे मांगल्याचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना किंवा मांडणी ठेवणं हे योग्यच. पण त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची जर मनं एकमेकांशी जुळलेली नसतील. तर कोणतीही रचना, कोणतीही ठेवण त्या घराचं मांगल्य टिकवणं हे मात्र कठीणच… वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते.

घर हे एक पवित्र मंदिराप्रमाणे असतं. कुठेही गेलो, कितीही दूर गेलो, पण परतून घरी आल्यावर एक वेगळेच समाधान मनाला मिळते. खूप शांत वाटते. अखंड प्रवासानंतर कुठेतरी निवांत थांबल्यावर जितकं बरं वाटतं, तितकंच बरं वाटतं. ही शांतता आपल्याच विचारांच्या कंपनांतुन निर्माण होत असते. जितके आपले विचार भटकतात, तितकंच समाधान लोप पावते. जितका आपल्या विचारांचा कलह वाढतो, तितकाच घरामध्ये क्लेश वाढतो. शांतता भंग पावते. आपल्याच विचारांमधून निर्माण झालेल्या कंपनांमधून कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ऊर्जा, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला घडवते. वाईट गोष्टींना भेदण्यासाठी, चांगल्या गोष्टींना बळ द्यावे लागते. ते मात्र आपल्याच प्रयत्नांत असतं. वास्तू तर फक्त तथास्तु म्हणते, मग तिथे मंगल घडो अथवा दंगल….

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 56 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..