नवीन लेखन...

निरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा

नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा….

चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत.

असुर महिषासुराच्या उन्मत्तपणाला त्रस्त होऊन, देवांनी केलेल्या प्रार्थनेला स्वीकारून आणि त्रिदेवांच्या साक्षीने मातेने नऊ दुर्गेचा अवतार धारण केला आहे. असुर महिषासुरासोबत युद्धाला प्रारंभ करण्याआधी मातेने विजेहुनही कितीतरी अधिक पटीने शक्तिशाली असा कंपनात्मक घंण्टेचा नाद केला होता. त्या आवाजामु़ळेच असुर सेना उध्वस्त झाली होती. नष्ट झाली होती. त्या आवाजामुळेच असुरांमध्ये भय निर्माण झाले होते. या भयनादामुळेच असुरसेनेची  असुरी ऊर्जा ही कमकुवत झाली आणि संपुर्ण देवलोकांमध्ये समाधानाचे दृश्य दिसून आले.

चंद्रघण्टा मातेचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये संकटावर मात करण्यासाठी मनाला लागणारी जागृती निर्माण होते. या मातेचे ध्यान आपल्यामध्ये सामर्थ्यासोबत सजगता निर्माण करते.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 56 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..