अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच […]
“बोला अमृत बोला…‘, “आला खुशीत समिंदर…‘ “क्षण आला भाग्याचा…‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८ व्या वर्षी […]
५ ऑगस्ट १९६० साली भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील बहुचर्चित चित्रपट “मुगल ए आझम ” मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, या गोष्टीला ५७ वर्षे झाली. हिंदी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला आणि अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलेला ‘मुघल ए आझम’ हा ‘क्लासिक’ चित्रपट आज अनेक वर्षे सुजाण प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. मूळ ‘मुघल ए आझम’ चित्रपट हा देखील […]
चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत […]
किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही […]
‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडकर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१९ रोजी नैरोबी येथे झाला. जयदेव यांचा लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर […]
‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक होते. शकील ज्या […]
पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.चिल्लापल्ली […]
पु.शि.रेगे यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स“ मधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला.अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्या् उत्कट अशा मनोहर भावनांनी […]
डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. […]