भारतीय सिनेमाच्या ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. मीनाकुमारी यांचे मूळ नाव महजबी बानो होते. मीनाकुमारी हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली. मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. मीना कुमारी यांना कलेचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील […]
पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले. […]
बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले. बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. […]
विश्वजनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर मा.वसंत बापट ‘नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक […]
हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मा.बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. “इन्साफ” या चित्रपटाच्या लेखनापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. मा.बी. आर.इशारा यांनी चित्रपटसृष्टीत “बोल्ड‘ […]
भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. […]
कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची ‘गाइ घरा आल्या’ ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन […]
शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपैकी एक आहे. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला. ‘शोले’ मधील गब्बरची भूमिका करून ‘अमजद खान’ यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. ‘शोले’ या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो […]
२७ जुलै १९७३ साली ‘अभिमान’ चित्रपट प्रदर्शीत झाला त्याला २७ जुलै २०१७ रोजी ४४ वर्षे झाली. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अभिमान’. सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात […]
दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.१९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं […]