नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अद्वितीय, अनुकरणीय उद्योजक – श्री.सुभाष चुत्तर

१० वी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय आणि सगळचं अनाकलनीय. अर्थात यामागे किती कष्ट आणि ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आला नाही. पण सुभाष चुत्तारांचा हा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच. […]

‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले

आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू मन्मनच्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या […]

बासरीवादक पन्नालाल घोष

प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता. […]

रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल

प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले. […]

विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी

दानशूर उद्योजक, विप्रो उद्योगसमूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम परिवारात २४ जुलै  १९४५ रोजी झाला. प्रेमजी यांचे आजोबा ब्रिआटिशांच्या काळाज जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत असत. त्यांची जपान, रंगून (ब्रह्मदेश) व अन्य ठिकाणी तांदूळ निर्मितीची कार्यालये होती. ‘राइस किंग’ असे त्यांना त्याकाळी म्हटले जाई. बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. […]

अभिनेते मिलिंद गुणाजी

महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. […]

अभिनेते डॉ. मोहन आगाशे

डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन म्हणून ओळखले जातात. […]

ज्येष्ठ गायिका धोंडुताई कुलकर्णी

वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात पसरले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गानकला सादर करण्याची संधी मिळाली. […]

महान पार्श्वगायक मुकेश

१९४८ साली आलेल्या ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मा.मुकेश यांनी पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मा.मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी! आग, आवारा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मा.मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली. […]

1 296 297 298 299 300 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..