पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर, पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. […]
माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. […]
सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज बादशाह होते. सज्जाद हुसेन यांना गाण्याची एक ही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहाँ यांना सुध्दा सुनावले होते. […]
आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली. […]
१९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता. […]
‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर […]
मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे. मधुकर तोरडमल यांनी कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले. […]