पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी […]
भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली ‘मिस इंडिया’ हा बहुमान पटकावला होता. ‘व्होग’ नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता. त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित […]
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती. नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या प्रारंभीच ‘श्री गणराय नर्तन करी’ या नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. ‘गाढवाचं लग्न’ […]
हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर […]
ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका कलापिनी कोमकली यांनी आपल्या आई बद्दल व्यक्त केलेल्या या भावना.. आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. […]
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे […]
शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब […]
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून वसुंधरा कोमकली यांची ओळख होती. वसुंधरा कोमकली यांचा जन्म २३ मे १९३१ रोजी जमशेदपूर येथे झाला. १९४२ मध्ये त्यांनी आधी कलकत्ता आणि तिथून कुमार गंधर्व आणि प्रोफेसर बी. आर. देवधर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवण्यासाठी मुंबई गाठली. त्यानंतर कुमार गंधर्व यांच्याशीच विवाह करून त्या देवास येथे स्थायिक झाल्या. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले […]
गाण्याचा कुठलाही प्रकार गाऊ शकणारी रफीची रेंज नाही, आवाज कसाही फिरवण्याची किशोरसारखी दैवी देणगी नाही किंवा शास्त्रीय संगीताने दिलेला मन्ना डे सारखा आत्मविश्वास नाही. सरळ सोप्प्या सुटसुटीत चाली गाणारा मुकेश तरीही प्रत्येक गानरसिकांच्या हृदयात वेगळी जागा स्थापन करून आहे. […]
थॉमस अल्वा एडिसन हे नाव प्रत्येक साक्षर भारतीयाला माहिती आहे. पण मला खात्री आहे की शंकर आबाजी भिसे हे नाव भारतीय सोडा पण महाराष्ट्रीयन माणसांना पण माहिती नसेल. शंकर आबाजी भिसे यांना भारतीय एडिसन म्हणून सम्बोधले जाते. त्यांच्या नावावर ४० पेटन्टस आणि २०० शोध नमूद आहेत. […]