नवीन लेखन...

मराठी, हिन्दीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर

त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.

बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर मा. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्‍तिमहत्त्व असलेल्या मा. पु. ल. देशपांडे यांच्या ’वार्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.

त्यांनी सगीताचे आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.

त्यांनी दत्‍ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्‍की,अवधुत गुप्‍ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिन्दी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांची शिर्षक गीते गायिली आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..